
EPFO Balance Check : फक्त एका Hello ने चेक करता येईल तुमचा पीएफ बॅलन्स, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या हे फिचर
EPFO कर्मचाऱ्यांसाठी एक खास सुविधा घेऊन आला आहे ज्याच्या मदतीने फक्त एका Hello मेसेजवरुन तुम्हाला तुमचा PF बॅलेन्स चेक करता येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, EPFO ची सुविधा लवकरच WhatsApp वर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यात तुम्हाला फक्त PF बॅलेन्स नाही तर क्लेम स्टेटस देखील पाहता येईल. यामुळे तुम्हाला आता पुन्हा पुन्हा वेबसाईवर जाऊन लाॅगीन करण्याची गरज भासणार नाही. याऐवजी फक्त व्हाॅट्सॲप चॅट उघडून तुम्हाला पीएफची सर्व माहिती मिळवता येईल. लक्षात घ्या, ही सर्व्हिस २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु असेल ज्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला तुमचा पीएफ मॅनेज करता येईल.
व्हाॅट्सॲपवर कसा चेक करता येईल पीएफ?
बॅग्राऊंडमध्ये असेल एआय चॅटबाॅट
आणखी एक खास गोष्ट म्हणजे या नव्या सर्व्हिसला रिअर टाईम बनवण्यासाठी EPFO बॅग्राऊंडमध्ये एआय चॅटबाॅटचाही वापर करणार आहे. रिपोर्टनुसार हा एआय तुम्ही व्हाॅट्सॲपवर पाठवलेल्या विनंतीवर प्रक्रिया करेल आणि EPFO च्या संपूर्ण डेटाबेसची माहिती काढून तुमच्या स्क्रिनवर पाठवून ठेवेल.