iPhone सारखी डिझाईन अन् पावरफुल फीचर्स... नव्या itel स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; सुरुवातीची किंमत केवळ 8,999 रुपये
लेटेस्ट स्मार्टफोन कंपनीने 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनची रॅम वर्च्युअली 5GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. नवं डिव्हाईस 8,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ग्राहक कॉमेट ऑरेंज, क्लाउड व्हाइट आणि ब्लॅक या तीन रंगात स्मार्टफोन खरेदी करू शकतात. इतकंच नाही तर, फोनसोबत 100 दिवसांसाठी मोफत स्क्रीन बदलून देण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. itel A100 Pro मध्ये 6.6 इंच एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच आहे, ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये DTS ऑडियो टेक्नोलॉजी मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला फोनमध्ये अधिक चांगला साऊंड अनुभव मिळणार आहे. स्मार्टफोनच्या परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T7100 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 15 गो एडिशनने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नव्या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. एवढंच नाही तर फोनमध्ये अॅडव्हांस इमेज प्रोसेसिंग फीचर्स देखील मिळणार आहे.
itel A100 Pro मध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. डिव्हाईसमध्ये फेस अनलॉक फीचर देखील मिळणार आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड सर्टिफिकेशन मिळणार आहे, ज्यामुळे डिव्हाईस आणखी खास बनते.
Ans: itel A100 Pro स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Ans: या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते, तसेच रॅम 5GB पर्यंत व्हर्च्युअली वाढवता येते.
Ans: फोनमध्ये 6.6-इंच HD+ IPS डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.






