
Facebook New Update: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पूर्वी फेसबुक अॅप उडल्यावर मित्रांच्या पोस्ट, फोटो किंवा बातम्या दिसत होत्या. मात्र मेटाने केलेल्या एका रिसर्चमध्ये असे लक्षात आले की, लोकांना आता पोस्ट वाचण्यापेक्षा व्हिडिओ बघण्यात जास्त रस आहे. लोक त्याचा वेळ सगळ्यात जास्त हा रिल्सवर वेळ घालवतात. यासाठी फेसबुकने हा व्हिडिओ-फर्स्ट प्लॅन आणला आहे. आता अॅप उघडताच तुम्हाला फुल स्क्रीनवर रील्स आणि व्हिडिओ दिसतील. तसेच स्क्रोल करताच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील.
जुनी फीड बंद झाली नसून अॅपमध्ये एका वेगळ्या टॅबमध्ये जाणार आहे. जर हवी असेल तर तिथे जाऊन आपल्या जुन्या पोस्ट बघू शकता. सर्वात महत्त्वाची हा अपडेट तुम्हाला आवडला नाहीतर, तर तुम्ही तो बंद पण करू शकता. यासाठी कंपनीने Opt-Out चा ऑप्शन दिला आहे.
फेसबुकने फक्त बघणाऱ्यांसाठीच नाही तर विकणाऱ्यांसाठी पण एक धमाका केला आहे. फेसबुक मार्केटप्लेसला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने मेटाने ‘Seller’ नावाचं एक नवीन आणि फ्री अॅप लाँच केलं आहे. हे अॅप मार्केटप्लेसवर वस्तू विकणाऱ्यांसाठी आहे. यात AI ची खूप मोठी मदत मिळणार आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला तुमची एखादी वस्तू विकायची आहे. तुम्हाला फक्त त्या वस्तूचा एक फोटो काढून अपलोड करायचा आहे. बाकीचं सगळं काम Meta AI करेल. तो स्वतःहून त्या वस्तूचं नाव काय ठेवायचं, तिचं वर्णन काय लिहायचं, ती कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायची आणि तिची किंमत काय असावी हे सगळं सुचवेल. त्यामुळे विक्रेत्यांचं अर्धं काम तर इथेच सोपं झालं.
Instagram चा गेम बदलणार! MUSE AI एजंटमुळे युजर्सना मिळणार नवा अनुभव, नेमकं काय आहे अपडेट जाणून घ्या…
इतकंच नाही, जे लोक मोठ्या प्रमाणावर विक्री करतात, त्यांना ग्राहकांचे सगळे मेसेज एका ठिकाणी बघता येतील. त्यासाठी Unified Inbox दिला आहे. आणि किती माल शिल्लक आहे, काय विकलं गेलं हे बघण्यासाठी Inventory Management Tool पण दिलं आहे.
सध्या हे सेलर अॅप अमेरिकेत iOS युजर्ससाठी सुरू झालं आहे. लवकरच ते अँड्रॉइडसाठी पण येणार आहे आणि नंतर भारतात पण लाँच होईल. एकंदरीत फेसबुकला आता पूर्णपणे व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनायचं आहे. लोक जास्तीत जास्त वेळ व्हिडिओ बघत राहावेत हाच त्यामागचा उद्देश आहे.