
फ्लॅगशिप गॅलेक्सी टॅब एस१०+ टॅब्लेटवर ऑफर्स
या फेस्टिव्ह सीजन ऑफरअंतर्गत, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या गॅलेक्सी टॅब एस१०+ वाय-फाय व्हेरियंटची मूळ किंमत १,०५,९९९ रुपये असून ते ८८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर याच स्टोरेजमधील गॅलेक्सी टॅब एस१०+ ५जी व्हेरियंटची मूळ किंमत १,२०,९९९ रुपये असून ते १,०३,९९९ रुपयांच्या विशेष फेस्टीव्ह किंमतीत खरेदी करता येईल.
ग्राहक बँका (६ महिने) आणि एनबीएफसी (१२ महिन्यांपर्यंत)च्या माध्यमातून नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा लाभ देखील घेऊ शकतात. गॅलेक्सी टॅब एस१०+ वाय-फाय व्हेरिएंटसाठी, मासिक ईएमआय पर्यायांमध्ये बँकांद्वारे १४८३३ रुपये, एनबीएफसीद्वारे ७४१७ रुपये आणि १५ टक्के डाउन पेमेंटसह सॅमसंग फायनान्स+ द्वारे ६८७७ रुपयांचा समावेश आहे. ५जी व्हेरिएंटसाठी, मासिक ईएमआय पर्यायांमध्ये बँकांद्वारे १७३३३ रुपये, एनबीएफसीद्वारे ८६६७ रुपये आणि १५ टक्के डाउन पेमेंटसह सॅमसंग फायनान्स+ द्वारे ८०३६ रुपयांचा समावेश आहे.
गॅलेक्सी टॅब एस१०+ मध्ये ३१.४७ सेमी डायनॅमिक एएमओएलईडी २एक्स डिस्प्ले अँटी-रिफ्लेक्टिव्ह तंत्रज्ञानासह येतो, जो ग्लेअर कमी करून आकर्षक व्हिज्युअल्स प्रदान करतो. तुम्ही डॉक्यूमेंट्सवर काम करत असा, सादरीकरणांचे (प्रेझेंटेशन्स) पुनरावलोकन करत असा किंवा कंटेंट स्ट्रीम करत असा, हा डिस्प्ले उत्साहवर्धक अनुभव सुनिश्चित करतो. गॅलेक्सी टॅब एस१०+ चा क्वॉड-स्पीकर सेटअप, एआय-संचालित डायलॉग बूस्टने सुसज्ज असून स्पष्ट ऑडिओ प्रदान करतो, तर त्याचे आयपी६८ रेटिंग आणि आर्मर अॅल्युम्नील्युमिनियम रचना दैनंदिन वापरासाठी टिकऊपणा सुनिश्चित करते.
गॅलेक्सी टॅब एस१०+ सोबत समाविष्ट असलेले सहज वापरता येणारे एस पेन उत्पादकता आणि सर्जनशीलतेसाठी नवीन शक्यतांचे मार्ग खुले करते. बैठकींदरम्यान संकल्पना लिहून ठेवण्यापासून ते डॉक्यूमेंट्सवर नोंदी करणे किंवा संकल्पनांचे स्केच काढण्यापर्यंत, एस पेन टॅब्लेटशी संवाद साधण्याचा नैसर्गिक मार्ग प्रदान करते. नोट असिस्ट ट्रान्सक्रिप्शन आणि सारांश स्वयंचलित करण्यासाठी एआयचा वापर करते, ज्यामुळे दीर्घ चर्चा किंवा व्याख्यानांचे व्यवस्थित टिपणांमध्ये रूपांतर होते. पीडीएफ ओव्हरले ट्रान्सलेशन वापरकर्त्यांना ऑन-स्क्रीन ओव्हरलेद्वारे सहजतेने पीडीएफ भाषांतरित करण्यास सक्षम करते, ज्यामुळे बहुभाषी डॉक्यूमेंट हाताळणे सोपे होते. हँडरायटिंग हेल्प हाताने लिहिलेल्या नोट्स अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी आणि वाचता येण्याजोगे करण्यासाठी सुस्पष्ट करून वापर सुलभ करते.
गॅलेक्सी टॅब एस१०+ दैनंदिन परस्परसंवाद सोपे करतो, ज्यामध्ये गुगलचे सर्कल टू सर्च वैशिष्ट्य वापरकर्त्यांना अॅप्स न बदलता स्क्रीनवर थेट माहिती शोधण्याची किंवा भाषांतर करण्याची सुविधा देते. हे वैशिष्ट्य विषयांवर संशोधन करण्यास, वाचताना माहिती शोधण्यास किंवा त्वरित मजकूराचे भाषांतर करण्यास मदत करते. एआयसह एअर कमांड गॅलेक्सी एआय असिस्टंट वैशिष्ट्यांमध्ये जलद प्रवेश प्रदान करते, तर गॅलेक्सी एआय परिसंस्था वापरकर्त्यांना अनुकूल अनुभवांसाठी सॅमसंगच्या बिक्सबी आणि गूगलच्या जेमिनीपैकी निवड करण्याची सुविधा देते.
Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
उत्पादकता आणि सर्जनशीलतेच्या पलीकडे, गॅलेक्सी टॅब एस१०+ स्मार्ट होम हब म्हणूनही कार्य करतो. ३डी मॅप व्ह्यू आणि स्मार्टथिंग्स इंटिग्रेशनसह वापरकर्ते अॅप्समध्ये अदलाबदल न करता एकाच स्क्रीनवरून कनेक्ट केलेले होम डिवाईसेस पाहू शकतात. स्मार्टथिंग्स एनर्जी आणि एआय एनर्जी मोड कनेक्ट केलेल्या डिवाईसेसमधील ऊर्जेच्या वापराविषयी माहिती देतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या घराचा ऊर्जा वापर प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत होते.
गॅलेक्सी टॅब एस१०+ हा मीडियाटेक डायमेन्सिटी ९३००+ प्रोसेसरद्वारे संचालित आहे, ज्याची डिझाइन स्लिम आणि सहज वाहून नेण्यायोग्य आहे. यामध्ये १२ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज (मायक्रोएसडीद्वारे वाढवता येण्याजोगे), १००९० एमएएच बॅटरी आणि ४५ वॅट चार्जिंगचा समावेश आहे, जे वापरकर्त्यांना दिवसभर चालता-फिरता उत्पादकता आणि स्थिरता प्रदान करते.