Free वाय-फायच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक... वेळीच 'या' गोष्टी ध्यानात असूद्यात
बऱ्याचदा फ्री वाय-फाय या गोष्टीकडे अनेकजण आकर्षित होतात. इंटरनेटचे वाढते दर पाहता जर फ्रीमध्ये आपल्याला इंटरनेट मिळत असेल तर ते कोणाला आवडणार नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का? या फ्री वाय-फायच्या नावाखाली तुमच्यासोबत घोटाळा होऊ शकतो. अलीकडेच, यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना पब्लिक वाय-फायद्वारे पर्सनल किंवा प्रोफेशनल अकाउंट्समध्ये लॉग इन न करण्याचा सल्ला दिला आहे.
असे फ्री पब्लिक वाय-फाय युज करून तुम्ही तुमची प्रायव्हसी धोक्यात आणू शकता. याचा वापर करून लोक घोटाळे किंवा फसवणुकीला बळी पडू शकतात, असा इशारा यूजीसीने विद्यार्थ्यांना दिला आहे. अशात तुम्ही देखील मोफत म्हणजेच पब्लिक वाय-फाय वापरत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे स्वतःला संकटात टाकू शकता.
Jio देत आहे फ्री Set-Top-Box! लाइव्ह टीव्ही चॅनेलसह मिळेल नेटफ्लिक्सचा आनंद
मोफत वाय-फाय साधारणपणे बस स्टॉप, रेल्वे, विमानतळ, कॅफे, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक लायब्ररी या सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहे. युजर्स कोणत्याही सक्रिय डेटा प्लॅनशिवायही या ठिकाणी त्यांच्या मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट इत्यादींवर इंटरनेट वापरू शकतात. अशा वाय-फाय सेवेला पब्लिक वाय-फाय म्हणतात. फ्री Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी, एक सामान्य पासवर्ड आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी पब्लिक वाय-फाय हे ओपन नेटवर्कवर ठेवले जाते, ज्यामुळे कोणीही त्यांच्या डिव्हाइसवर इंटरनेट वापरण्यास सक्षम असेल.
फ्री वाय-फायचा धोका
नावाप्रमाणेच, कोणीही त्यांचे डिव्हाइस पब्लिक वाय-फायद्वारे कनेक्ट करू शकतो. अशा परिस्थितीत या फ्री वाय-फायमध्ये घुसखोरी करणे हा हॅकर्ससाठी खेळ आहे. फ्री वाय-फाय सेवेत प्रवेश करून, ते कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवर सहजपणे व्हायरस किंवा मालवेअर पाठवू शकतात. त्यामुळे पब्लिक वाय-फायमध्ये डेटा चोरी आणि हॅकिंगचा धोका अधिक प्रमाणात असतो. पब्लिक वाय-फाय सर्व्हिस फ्री असल्याने, त्याच्या सुरक्षा अपडेट्सकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे हॅकर्सना कनेक्ट केलेल्या युजर्सच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळते. पब्लिक वाय-फाय द्वारे इंटरनेट वापरणाऱ्या लोकांनी फ्री वाय-फाय द्वारे आपल्या ई-मेल, बँकिंग इत्यादींमध्ये कधीही प्रवेश करू नये.
Incognito मोड काय आहे? इंकॉग्निटोवरील हिस्ट्री कशी डिलीट करावी? वेळीच जाणून घ्या
कोणत्या गोष्टी करू नयेत
फ्री वाय-फाय सर्व्हिस सामान्य नागरिकांसाठीच असते मात्र त्याचा वापर निष्काळजीपूर्वक करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत तुमचा फोन किंवा लॅपटॉप अगदी आवश्यक असल्याशिवाय कनेक्ट करू नका. तुम्ही पब्लिक वाय-फाय वापरत असल्यास, कोणतेही डिजिटल पेमेंट किंवा सोशल मीडिया ॲप्स ओपन करू नका. फारच गरज असल्यास तुम्ही या फ्री वाय-फायचा वापर Incognito ब्राउझर मध्ये करा, या मोडमध्ये आपला डेटा सेव्ह केला जात नाही.