(फोटो सौजन्य: Pinterest)
देशभरात रिलायन्स जिओचे नाव फार मोठे आहे. कंपनी नेहमीच आपल्या युजर्ससाठी काही ना काही नवीन ऑफर्स घेऊन येत असते. रिलायन्स जिओचा Jiofiber भारतात सर्वात मोठा फीक्स्ट लाइन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर बनला आहे. त्यातच आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे ज्याचा युजर्सना खूप फायदा होणार आहे. यानुसार आता ग्राहकांना कनेक्शन बुक करण्यासाठी पैशांची चिंता करण्याची गरज नाही. कंपनीच्या या नवीन ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
रिलायन्स जिओने कमी वेळेत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एअरफायबर किंवा 5G FWA प्लॅनच्या मदतीने होम कनेक्टिव्हिटी सुधारली जाऊ शकते. 100 एमबीपीएस स्पीड असलेल्या युजर्ससाठी सर्वोत्तम प्लॅन असतील. Jio AirFibe ची 100 Mbps योजना देखील आहे. एका वर्षासाठी डायरेक्ट प्लॅन मिळवण्याचा पर्यायही दिला आहे. प्लॅनच्या कॉलीटीबद्दल तुम्हाला काळजी वाटत असली तरीही तुम्ही त्याची सर्व्हिस घेऊ शकता.
WhatsApp देणार Gpay-Phonepay ला टक्कर! लवकरच लाँच होणार ‘ही’ सर्व्हिस, आजच जाणून घ्या
Jio AirFiber 899 Plan
जिओबद्दल, आम्ही तुम्हाला सांगतो की एक महिना किंवा 12 महिन्यांच्या प्लॅनसह फ्री सेट-टॉप-बॉक्स दिला जात आहे. तुम्ही 12 महिन्यांचा प्लान खरेदी केल्यास त्याची किंमत खूपच कमी असेल. वार्षिक प्लॅनसह कोणतेही इन्स्टॉलेशन फीज भरावी लागणार नाही. पण दरम्यान, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही फक्त 100 Mbps प्लॅनसह जावे. Jio AirFiber बद्दल बोलायचे झाले तर यूजर्सना 200 Mbps चा प्लान देखील दिला जात आहे. एक प्लॅन 899 रुपये प्रति महिना तर दुसरा प्लॅन 1199 रुपये प्रति महिना येतो. या सर्व प्लॅनमध्ये युजर्सना खूप चांगले OTT फायदे दिले जातात.
Jio-Airtel-Vodafone चे टेन्शन वाढले! बीएसएनएलने TATA शी केली हातमिळवणी
Jio AirFiber 1199 प्लॅन
Jio 899 प्लॅनमध्ये OTT फायदे चांगले आहेत कारण तुम्ही हा प्लान खरेदी केल्यास, तुम्हाला Disney+Hotstar, Zee5, SonyLIV, Jio Cinema Premium, SunNXT, Hoichoi, Discovery+, ALTBalaji, Eros Now, LionsgatePlay, ETVWin (JioTV+ द्वारे) आणि ShemarooMe चे सब्स्क्रिप्शन देखील मिळत आहे. 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये OTT फायदे मिळणार आहेत. हे Netflix (बेसिक), Amazon Prime Lite, YouTube Premium, Disney + Hotstar, Sony Liv, Zee5, Jio Cinema Premium, Sun Next, Hoichoi यासह अनेक OTT फायदे देते. हे Jio AirFiber चे सर्वात मोठे फीचर्स आहे. तसेच, कनेक्शन मिळविण्यासाठी तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागणार नाही. तुम्हाला त्याचे कनेक्शन सहज मिळणार आहे.