Smartphones Under 20K: Realme पासून Motorola पर्यंत! हे आहेत 20 हजारांच्या रेंजमध्ये उपलब्ध असणारे ढासू स्मार्टफोन्स
ज्या यूजर्सना सर्व बाजूंनी परफेक्ट स्मार्टफोन पाहिजे असेल त्यांच्यासाठी Motorola Edge 60 Fusion एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच OLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 प्रोसेसर दिला आहे, जो स्मूद परफॉर्मंस ऑफर करतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर OIS सह उपलब्ध आहे. ज्यामुळे चांगले फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले जाऊ शकतात. यामध्ये 68W फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरी दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्यांना व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि गेंमिंगसाठी स्मार्टफोन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी POCO X7 बेस्ट पर्याय आहे. यामध्ये 1.5K OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा सेटअप दिला आहे. 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली आहे. या फीचर्समुळे हा स्मार्टफोन एक उत्तम बजेट पर्याय ठरतो.
Realme P4 5G अशा यूजर्ससाठी परफेक्ट पर्याय आहे ज्यांना दिर्घकाळापर्यंत बॅटरी लाईफ पाहिजे आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच AMOLED डिस्प्ले, डाइमेंसिटी 7400 अल्ट्रा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा दिला आहे. हा फोन गेमिंगसाठी देखील एक चांगला पर्याय आहे.
जे लोकं स्मार्टफोनच्या लूक आणि डिझाईनवर जास्त लक्ष देतात त्यांना Infinix NOTE Edge 5G नक्की आवडेल. या स्मार्टफोनमध्ये 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि स्लिम डिझाईन दिली आहे. हा फोन 6500mAh बॅटरी आणि डाइमेंसिटी 7100 प्रोसेसरने सुसज्ज आहे. लो-लाइट फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनचा 50MP कॅमेरा चांगले रिझल्ट्स देतो.
भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर
ज्यांना बॅटरी आणि परफॉर्मंस दोन्ही दमदार पाहिजे असेल त्यांच्यासाठी Vivo T5x 5G एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 7400 टुर्बो प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले दिला आहे. हा फोन खास करून अशा यूजर्ससाठी आहे ज्यांना चार्जिंगशिवाय बराच वेळ फोन वापरायचा असतो.






