Amazon Diwali Sale 2025: यंदाच्या दिवाळीत स्वतःलाच द्या गिफ्ट! 63 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Galaxy Z Fold 6
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलचे दिवाळी स्पेशल एडिशन सुरु आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसह इतर अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. आयफोनपासून अँड्रॉईडपर्यंत या सेलमध्ये सर्व स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या डिल्स उपलब्ध आहेत. मात्र सध्या सर्व युजर्सचं लक्ष वेधलं आहे एका खास डिलने. Samsung Galaxy Z Fold 6 वर उपलब्ध असलेली डील पाहून सर्वजण चकित झाले आहेत.
सेलदरम्यान Samsung Galaxy Z Fold 6 या बुक-स्टाइल फोल्डेबल डिव्हाईसवर 63,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. त्यामुळे या डिलने सेलमध्ये सर्वांचे लक्ष वेधले आहे. अशा परिस्थितीत आता तुम्ही देखील हे प्रिमियम डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. तुम्हाला हे प्रिमियम डिव्हाईस आता 63,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगचा Galaxy Z Fold 6 हा प्रिमियम स्मार्टफोन भारतात 1,64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र सेलदरम्यान या स्मार्टफोनची अत्यंत कमी झाली आहे. आता या फोल्डेबल स्मार्टफोनवर 61,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलचे दिवाळी स्पेशल एडिशनमध्ये या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 1,03,999 रुपये झाली आहे. एवढंच नाही तर एचडीएफसी बँकेच्या ईएमआय व्यवहारांवर या डिव्हाइसवर 2,000 रुपयांपर्यंत सूट देखील दिली जात आहे. याशिवाय जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला, ज्याची कंडिशन चांगली असेल तर नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर 44,050 रुपयांर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 6 5G डिव्हाईसमध्ये तुम्हाला बाहेरिल बाजूस एक 6.3 इंचाचा AMOLED कवर डिस्प्ले दिला जाणार आहे. तर आतील बाजूस 7.6 इंच AMOLED स्क्रीन मिळणार आहे. डिव्हाईसच्या दोन्ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.
Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका
फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 3 चिपसेट आहे. हे डिव्हाईस 12GB पर्यंत रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेजसह जोडलेले आहे. फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,400mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेंसर, 12MP अल्ट्रा वाइड लेंस आणि 10MP चा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. तर डिव्हाइसमध्ये दोन फ्रंट कॅमेरे आहेत, त्यापैकी एक 10MP आणि दुसरा 4MP आहे.