
भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा
नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, भारतातील GEN-Z यूजर्स युट्यूबवर दुसऱ्या भाषेतील ट्रांसलेटेड कंटेट बघतात. यूट्यूबच्या एंड-ऑफ-ईयर रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की, भारतातील 4 पैकी 3 GEN-Z यूजर्स युट्यूबवर दुसऱ्या भाषेतील कंटेट बघतात. यमध्ये असं सांगितलं आहे की, 77 टक्के यूजर्सनी दुसऱ्या भाषेतील ट्रांसलेटेड किंवा डब्ड कंटेट बघितला आहे, तर 68 टक्के यूजर्सनी यूट्यूब वीडियोद्वारे शिकलेल्या भाषा आणि फ्रेजेज त्यांच्या रोजच्या जीवनात वापरण्यास सुरुवात केली. 76 टक्के GEN-Z यूजर्सनी इंटरनेशनल इवेंट्सद्वारे माहिती मिळवण्यासाठी युट्यूबची मदत घेतली. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्टनुसार, जेन-जी यूजर्सनी पॉपुलर कंटेट क्रिएटर MrBeast च्या कंटेटला जास्त पसंती दिली. MrBeast चे व्हिडीओ 7 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या चॅनलवर भारतातील सबस्काईबर्सची संख्या सुमारे 4.7 करोड आहे. यामुळे असं स्पष्ट होतं की युट्यूबवरील व्हिडीओंना भाषेचे कोणतेही बंधन नसतं. क्रिएटर्स आणि स्टूडीओ त्यांचा कंटेट वेगवेगळ्या भाषेच्या हिशोबाने तयार करतात. अनेक भारतीय कंटेट इतरत देशात लोकप्रिय होत आहेत तर इतर देशातील कंटेट देखील भारतात लोकप्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रिपोर्टमध्ये राज शमानी आणि सेजल गाबा सारख्या क्रिएटर्सचा उल्लेख करण्यात आला आहे, जे यूट्यूबरनंतर एंटरप्रेन्योर्स झाले आहेत.
AI मुळे क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडीओमध्ये फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ प्रोडक्शन आणखी सोपं झालं आहे. यूट्यूबचे इंस्पिरेशन टॅब, एडिट विद AI आणि ऑटो-डबिंगसारख्ये फीचरच्या मदतीने आता व्हिडीओ तयार करणं आणखी सोपं झालं आहे. ऑटो-डबिंग फीचर यूजर्सना जास्तीच्या इनवेस्टमेंटशिवाय संपूर्ण जगात ओळख तयार करण्यासाठी मदत करत आहे. यूट्यूब डेटा दर्शवितो की पुढील वर्षी भारतातील डिजिटल कंटेट क्षेत्रातील भाषा आणि भौगोलिक अंतर आणखी कमी होईल. यामुळे क्रिएटरना त्यांची सांस्कृतिक ओळखीचे बलिदान न देता सर्व भाषांमध्ये त्यांचा कंटेट विस्तारित करावा लागेल.
Ans: Ads, memberships, Super Chat आणि brand deals मधून YouTube वर पैसे कमावतात
Ans: हो, Ads revenue sharing आणि बोनसद्वारे YouTube Shorts वर पैसे मिळतात.
Ans: Watch time, engagement आणि consistency वर आधारित.