Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय
प्रत्येक वर्षी दिवाळीला तुम्ही देखील तुमच्या भावंंडांना मिठाई आणि चॉकलेट्स देऊन कंटाळला आहात का. तर यंदाच्या दिवाळीला भावंडांना काहीतरी खास गिफ्ट देऊ. असं एखादं गिफ्ट देऊ जे गिफ्ट उपयोगी ठरेल आणि बजेटमध्ये देखील असणार आहे. आता आम्ही तुम्हाला अशा काही गिफ्ट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. हे गिफ्ट पाहून नक्कीच तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांना गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुमच्या घरच्यांना, हे गिफ्ट अतिशय योग्य आहेत.
जर तुम्हाला एखाद्या गेमिंग लवरला गिफ्ट द्यायचं असेल तर हे ऑप्शन बेस्ट ठरणार आहे. भारतीय ब्रांड Lava चा हा स्मार्टफोन बेस्ट गेमिंग स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनची डिझाईन गेमिंग लवर्ससाठी अतिशय योग्य आहे. याशिवाय हा स्मार्टफोन पावरफुल परफॉर्मेंस ऑफर करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्टाइलिश टॅबलेटच्या शोधात असाल तर OPPO Pad SE तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हे टॅब 90Hz डिस्प्ले, क्वाड स्पीकर सेटअप आणि मोठी बॅटरी ऑफर करते. या डिव्हाईसची डिझाईन प्रत्येक वयाच्या लोकांसाठी योग्य आहे.
मूवी लवर्ससाठी Sony HT-S20R होम थिएटर एक उत्तम दिवाळी गिफ्ट आहे. 5.1 चैनल सेटअप आणि Dolby Digital साउंडसह प्रत्येत मूवी नाइटसाठी थिएटरसारखा अनुभव देतो.
तुम्हाला देखील प्रत्येक क्षण कॅप्चर करायला आवडत असेल तर हा कॅमेरा बेस्ट आहे. Instax Mini 12 तुम्हाला फोटो क्लिक करण्यासह लगेच प्रिंट करण्याची सुविधा देखील देते. हे गिफ्ट पार्टी आणि फॅमिली फंक्शनसाठी परफेक्ट गिफ्ट आहे.
म्यूजिक लवर्ससाठी boAt PartyPal 160W एक बेस्ट ऑप्शन आहे. दमदार बास आणि जबरदस्त साउंडसह हा स्पीकर प्रत्येक उत्सव अविस्मरणयीत बनवतो.
जर तुम्ही एखादे प्रॅक्टिकल गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर Midea Dishwasher एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. हे डिव्हाईस दिवाळी गिफ्टसाठी एक चांगला ऑप्शन आहे. हे छोट्या कुटूंबासाठी एक उत्तम गिफ्ट आहे.
तुम्हाला देखील असं वाटतं का टिव्हीच्या किंमती अत्यंत जास्त आहेत? आता आण्ही तुम्हाला अशा एका टिव्हीबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 8 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. Thomson चे हे QLED टीवी उत्तम डिस्प्ले आणि साउंड क्वालिटीसह एक एंटरटेनमेंट पैकेज आहे.
Dreame H11 Handheld Vacuum Cleaner ही स्वच्छता सोपी करण्यासाठी एक स्टायलिश आणि स्मार्ट भेट आहे. हलके, शक्तिशाली आणि उपयुक्त!