Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
टेक दिग्गज कंपनी Apple ने नुकताच त्यांचा स्लिम आयफोन म्हणजेच iPhone Air चीनमध्ये लाँच केला आहे. हा आयफोन चीनमध्ये लाँच करताच अगदी काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला. त्यामुळे सर्वचजण अचंबित झाले आहेत. अमेरिका आणि चीन या देशांमध्ये टेरिफ प्लॅनमुळे तणाव निर्माण झाला आहे. अशाचवेळी कंपनीने त्यांच्या पातळ आयफोनचं लाँचिंग चीनमध्ये केलं. हा आयफोन लाँच झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आऊट ऑफ स्टॉक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे चीनमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. चिनी ग्राहकांमध्ये आयफोनची असलेली क्रेझ पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
Android ब्रांड्स जसे Huawei आणि Xiaomi च्या जबरदस्त स्पर्धेत देखील Apple ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. रिपोर्ट्सनुसार, या आयफोन मॉडेलची प्री-सेल्स शुक्रवारी सकाळी 9 वाजता सुरु झाली आणि बीजिंग, शंघाई तसेच तियानजिन सारख्या मोठ्या शहरांतील स्टोअर्समधून हा आयफोन काही क्षणातच आऊट ऑफ स्टॉक झाला. ऑनलाइन ऑर्डर्ससाठी डिलीवरी एक ते दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple चे सिईओ टिम कुक यांनी या आठवड्यात चीन दौरा केला होता. यावेळी त्यांनी सर्वात पातळ iPhone Air ला प्रमोट केले होते. त्यांनी चीनचे उपपंतप्रधान हे लीफेंग आणि वाणिज्य मंत्री वांग वेनताओ यांची भेट घेतली आणि आर्थिक सहकार्य आणि व्यापार संबंधांवर चर्चा केली. कुक यांनी सांगितलं की, Apple चीनसह त्यांचे संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्यामुळे जागतिक आर्थिक विकासात योगदान दिलं जाणार आहे.
रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, iPhone Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका आयफोन आहे. हा आयफोन केवळ e-SIM सपोर्टवर आधारित आहे. कंपनीचे हे फीचर तरूणांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहे. या आयफोनची विक्री सुरु होताच त्याची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे काही क्षणातच Apple च्या वेबसाईटवर या आयफोनचा स्टॉक आऊट ऑफ स्टॉक झाला.
नुकत्याच जारी केलेल्या आकड्यांनुसार, चीनच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये तिसऱ्या तिमाहीत 3% घट झाली. तरीही, Vivo 18% बाजारपेठेसह पहिल्या स्थानावर राहिला, तर Huawei आणि Apple अनुक्रमे 16% आणि 15% शेअरसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आले.
टिम कुकने त्यांच्या Weibo अकाऊंटवर सांगितलं आहे की, Apple बीजिंगच्या Anzhen Hospital सह काम करणार आहे. ज्यामुळे Apple Watch द्वारे हृदयाशी संबंधित आजारांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. याशिवाय त्यांनी Tsinghua University साठी देखील मोठे डोनेशन देण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे भविष्यातील पर्यावरणीय नेते तयार केले जाऊ शकतात.