Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक

Battlegrounds Mobile India: मोबाईल गेमिंगमध्ये एक मोठा बदल होणार आहे. लोकप्रिय Royal Enfield चा अनुभव आता BGMI मध्ये देखील मिळणार आहे. कंपन्यांच्या या पार्टनरशिपमुळे गेमिंगचा अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 14, 2026 | 11:42 AM
गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक

Follow Us
Close
Follow Us:
  • Continental GT 650 पहिल्यांदा वर्चुअल जगात दिसणार
  • मोबाईल गेमिंग आणि मोटरसाइकिलिंगमधील भारतातील दोन यूथ कल्चर एकत्र काम करणार
  • डिजिटल आणि रियल वर्ल्ड यांच्यामधील अंतर कमी होणार
सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोटार सायकल ब्रँड्सपैकी एक असलेली Royal Enfield चा अनुभव आता तुम्हाला मोबाईल गेमिंगमध्ये देखील घेण्याची संधी मिळणार आहे. कारण अनेकांचा आवडता मोबाईल गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया म्हणजेच बीजीएमआय आणि रॉयल एनफिल्ड यांनी पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या कोलॅबोरेशनअंतर्गत रॉयल एनफिल्डची लोकप्रिय Bullet 350 आणि स्पोर्टी Continental GT 650 पहिल्यांदा वर्चुअल जगात पाहायला मिळणार आहे.

Samsung Galaxy A07 5G: बजेटमध्ये नवा सॅमसंग स्मार्टफोन लाँच, 6000mAh बॅटरीने सुसज्ज! फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

रॉयल एनफिल्ड दिसणार वर्चुअल जगात

बुलेट 350 आणि स्पोर्टी कॉन्टिनेंटल जीटी 650 पहिल्यांदाच बीजीएमआयच्या वर्चुअल जगात देखील राइडेबल मोटरसायकल म्हणून सादर केली जाणार आहे. या दोन्ही मोटारसायकल गेममध्ये बीजीएमआयच्या 4.2 अपडेट नंतर पाहायला मिळणार आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी नवीन अपडेट लाईव्ह होणार आहे. तथापि, प्लेयर्स 19 जानेवारी 2026 पासून गेममध्ये या बाईक चालवू शकतील. नवीन अपडेट आणि कंपन्यांनी केलेल्या पार्टनरशिपमुळे ऑनलाईन गेमिंगची मजा आणखी वाढणार आहे. (फोटो सौजन्य – X)

गेमिंग प्लॅटफॉर्मवर दिसणार आता तुमची आवडती बाईक

कंपन्यांनी केलेल्या या पार्टनरशिपचा फायदा म्हणजेच मोबाईल गेमिंग आणि मोटरसाइकिलिंगमधील भारतातील दोन यूथ कल्चर एकत्र काम करणार आहेत. प्लेअर्स आता वर्चुअल बॅटलफील्डवर रॉयल एनफिल्डच्या दमदार बाईक्स चालवण्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. तसेच बाईक लवर्सना त्यांच्या आवडत्या बाईकची झलक देशातील सर्वात मोठ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत ज्या बाईक केवळ रस्त्यावर धावत होत्या, त्या आता गेममध्ये देखील दिसणार आहेत.

डिजिटल आणि रियल वर्ल्डमधील अंतर कमी होणार

एवढंच नाही या पार्टरनशिप अंतर्गत रॉयल एनफिल्डने कॉन्टिनेन्टल GT 650 वर बेस्ड एक कस्टम-बिल्ट बाईक देखील लाईव्ह ईव्हेंट दरम्यान सादर केली जाणार आहे. जे BGMI च्या टॅक्टिकल आणि वॉर-रेडी लुकपासून अत्यंत प्रेरित असणार आहे. या बाईकमध्ये तुम्हाला पिकाटिनी रेल्स, आर्मर्ड प्लेटिंग, पॅराशूट टाई-डाउन पॉइंट्स आणि बॅलून टायर्स सारखे एलिमेंट्स देखील पाहायला मिळणार आहे. जे थेट BGMI च्या कॉम्बॅट आणि सर्वाइवल मेकेनिक्ससोबत जोडलेले असणार आहेत. या बाईक्स डिजिटल आणि रियल वर्ल्ड यांच्यामधील अंतर कमी करण्याचे काम करणार आहे.

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

रॉयल एनफिल्ड थीमवाले खास रिवॉर्ड देखील मिळणार

रॉयल एनफिल्डसंबंधित खास इन-गेम कंटेंट 19 जानेवारीपासून 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. यामध्ये स्पेशल SPIN फॉर्मेटद्वारे प्लेअर्स अनेक प्रीमियम रिवॉर्ड जिंकू शकणार आहेत. ज्यामध्ये मिथिक (रेड टियर) रेव्हल 01 सेट, बुलेट लाइन – पी90 गन स्किन, क्रँकगार्ड हेल्मेट, रोडबॉर्न रक्सॅक बॅकपॅक आणि रॉयल एनफील्ड बुलेट 350 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 देखील समाविष्ट असणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BGMI कोणत्या कंपनीने तयार केला आहे?

    Ans: BGMI हा गेम KRAFTON या कंपनीने विकसित केला आहे.

  • Que: BGMI आणि PUBG मध्ये काय फरक आहे?

    Ans: BGMI हा भारतासाठी तयार करण्यात आलेला PUBG चा भारतीय व्हर्जन आहे, ज्यामध्ये भारतीय नियम आणि सुरक्षा धोरणांचा विचार करण्यात आला आहे.

  • Que: BGMI Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे का?

    Ans: होय, BGMI Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Web Title: Good news for gamers royal enfield launched new bike for bgmi tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • online games
  • royal enfield
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स
1

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या
2

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
3

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.