OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! 'या' स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स
OnePlus 13 स्मार्टफोनच्या खरेदीवर आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्काऊंट उपलब्ध आहे. या डिव्हाईसची किंमत 8 हजार रुपयांनी कमी झाली आहे. गेल्यवर्षी कंपनीने हा स्मार्टफोन 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर OnePlus 13 स्मार्टफोन 61,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनवर 4,000 रुपयांचे बँक डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे. या ऑफरनंतर फोनची किंमत आणखी कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन 57,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच एक्वाटच 2.0 डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये OLED पॅनलचा वापर करण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. OnePlus 13 फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Elite मोबाइल प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 16GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देखील आहे. हा फोन 6,000mAh च्या दमदार बॅटरीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात आला आहे.
OnePlus 13 च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 50MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि 50MP चा टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 15 ऑपरेटिंग सिस्टम आहे. कनेक्टिविटीसाठी वनप्लसच्या या फोनमध्ये 5.5G, 5G, WiFi, सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.






