Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi युजर्सची मज्जाच मजा! IPL बघायला जाताना विसरा नेटवर्कचं टेंशन, या स्टेडियमवर मिळणार सुपरफास्ट 5G स्पीड इंटरनेट

Vi 5G Network: टी-20 लीग सुरु झाली आहे आणि लाखो लोक सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचत असतानाच, आता व्हीआयचा 5G विस्तार करण्यात आला आहे. आता कंपनीने आपले नेटवर्क मजबूत करून अधिक शहरांमध्ये विस्तार केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2025 | 08:33 AM
Vi युजर्सची मज्जाच मजा! IPL बघायला जाताना विसरा नेटवर्कचं टेंशन, या स्टेडियमवर मिळणार सुपरफास्ट 5G स्पीड इंटरनेट

Vi युजर्सची मज्जाच मजा! IPL बघायला जाताना विसरा नेटवर्कचं टेंशन, या स्टेडियमवर मिळणार सुपरफास्ट 5G स्पीड इंटरनेट

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही देखील व्होडाफोन आयडिया (Vi) युजर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. व्होडाफोन आयडियाने त्यांच्या युजर्ससाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. IPL बघायला स्टेडिअमवर गेल्यानंतर अनेक व्होडाफोन आयडिया युजर्सना असा अनुभव आला की, त्यांचं नेटवर्क व्यवस्थित काम करत नाही. युजर्सच्या याच तक्रारीनंतर आता कंपनीने भारतातील 11 प्रमुख क्रिकेट स्टेडियममध्ये त्यांचे 5G नेटवर्कव विस्तारित केलं आहे. त्यामुळे आता भारतात सुरू असलेल्या टी-20 लीग दरम्यान, चाहते स्टेडियममध्ये बसून हाय-स्पीड व्हीआय 5G नेटवर्कचा आनंद घेऊ शकतील.

1674 चा तो ‘सुवर्णक्षण’, छत्रपती शिवयारांचा राज्याभिषेक सोहळा! सोशल मीडियावर व्हायरल होतोय AI Video, पाहून अंगावर शहारे येतील

व्होडाफोन आयडियाने मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनऊ, चंदीगड आणि विशाखापट्टणम यासारख्या शहरांमधील प्रमुख स्टेडियममध्ये त्यांच्या 5G नेटवर्कचा विस्तार केला आहे. त्यामुळे आता या स्टेडिअममध्ये मॅच पाहायला गेलेल्या सर्व युजर्सना मॅचसोबतच व्होडाफोन आयडियाच्या 5G नेटवर्कचा देखील आनंद घेता येणार आहे. त्यामुळे युजर्स त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लाईव्ह येऊ शकतात आणि त्यांच्या रिल्स देखील स्टेडिअममधून शेअर करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्टेडियममध्ये मिळणार व्होडाफोन आयडियाची चांगली कनेक्टिव्हिटी

गर्दीच्या ठिकाणी होणारा जास्त डेटा वापर लक्षात घेऊन, Vi ने त्यांचे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले आहे. कंपनीने 53 नवीन 5G साइट्स स्थापित केल्या आहेत, 44 विद्यमान साइट्स अपग्रेड केल्या आहेत आणि सामन्यादरम्यान नेटवर्कमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी 9 सेल ऑन व्हील्स (CoWs) देखील तैनात केले आहेत. त्यामुळे आता युजर्सना कोणत्याही अडथळ्याशिवाय मॅचचा आनंद घेता येणार आहे.

याशिवाय, व्हीआयने मॅसिव्ह एमआयएमओ आणि बीटीएस सारख्या प्रगत तंत्रज्ञानाची स्थापना केली आहे जेणेकरून स्टेडियममध्ये बसलेल्या युजर्सना जलद सिग्नल आणि हाय-स्पीड डेटा मिळेल. याचा अर्थ तुम्ही आता सामने लाईव्ह स्ट्रीम करू शकता, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकता आणि सोशल मीडियावर सक्रिय राहू शकता, हे सर्व कोणत्याही बफरिंगशिवाय आता शक्य होणार आहे.

Vi 5G चा फायदा कोणाला मिळेल?

वी चे 5G नेटवर्क 5G-समर्थित स्मार्टफोन असलेल्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यासाठी युजर्सना फक्त त्याच्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 5G चालू करावे लागेल. ही सुविधा वापरण्यासाठी वेगळे शुल्क नाही.

AI चा चुकीचा वापर जगासाठी ठरतोय धोकादायक, ChatGPT बनवतोय खोटं आधार आणि पॅन कार्ड! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

या स्टेडियममध्ये Vi 5G सुविधा उपलब्ध आहे

  • वानखेडे स्टेडियम, मुंबई
  • अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
  • चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
  • डॉ. YSR ACA-VDCA स्टेडियम, विशाखापट्टणम
  • ईडन गार्डन्स, कोलकाता
  • एकना स्टेडियम, लखनौ
  • एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियम, अहमदाबाद
  • महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियम, हैदराबाद
  • इंटरनॅशनल, मोदी स्टेडियम, चंडीगढ
  • सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर

घरी बसून सामने पाहणाऱ्यांसाठी Vi चा खास रिचार्ज पॅक

ज्यांना स्टेडियममध्ये जाता येत नाही त्यांच्यासाठी, Vi ने खास रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत, ज्याची सुरुवात 101 रुपयांपासून होते. या प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टार सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित डेटा देखील समाविष्ट आहे जेणेकरून चाहते घरी किंवा प्रवास करताना अखंडपणे सामना पाहू शकतील. हे रिचार्ज प्लॅन Vi अ‍ॅप किंवा Vi वेबसाइटवरून घेता येतील.

Web Title: Good news for vi users dont take tension while watching ipl match you will get full speed internet in stadium also tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • Mobile Network
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.