Google I/O 2025: उद्यापासून सुरु होणार गुगलचा सर्वात मोठा ईव्हेंट! अपडेटेड Gemini पासून Android 16 पर्यंत, कोणत्या घोषणा होणार?
टेकजायंट कंपनी गुगलने त्यांच्या सर्वात मोठ्या ईव्हेंट Google I/O 2025 चे आयोजन केले आहे. हा ईव्हेंट 20 मे म्हणजेच उद्यापासून सुरु होणार आहे. हा दोन दिवसांचा ईव्हेंट असणार आहे. 20 आणि 21 मे अशा दोन सुरु राहणाऱ्या या ईव्हेंटमध्ये अनेक घोषणा केल्या जाणार आहेत. हा एक मोठा ईव्हेंट असणार आहे आणि युजर्ससाठी खास असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ईव्हेंटमध्ये कंपनी मोठा धमाका करेल अशी आशा आहे.
ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य
मिळालेल्या माहितीनुसार, हा ईव्हेंट प्रत्येक अँड्रॉईड युजरसाठी खास असणार आहे. कारण या ईव्हेंटमध्ये युजर्सच्या फायद्याच्या ठरतील अशा अनेक घोषणा केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये अपडेटेड Gemini, Android 16, Extended Reality (XR) अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. यासोबतच Google I/O 2025 आणखी नव्या घोषणा केल्या जाऊ शकतात, अशी युजर्सना अपेक्षा आहे. या ईव्हेंटमध्ये Deepmind चा Project Astra आणि AI एजेंट्स देखील सादर केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google I/O 2025 ग्लोबली लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. तुम्ही हा ईव्हेंट YouTube वर अगदी सहजपणे लाईव्ह पाहू शकता. याशिवाय Google I/O च्या ऑफिशियल पोर्टलवर देखील या ईव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे.
Google I/O 2025 दरम्यान सर्वांच्या आवडत्या Gemini AI चे नवीन वर्जन लाँच केले जाऊ शकते. या नवीन आणि अपडेट करण्यात आलेल्या वर्जनमध्ये नवीन फीचर्स आणि अधिक चांगली एक्युरेसी पाहायला मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अपकमिंग Gemini AI वर्जनला कोडिंग आणि सॉफ्टवेयर डेवलपमेंटसाठी तयार केलं जाणार आहे. यासोबतच कंपनी Gemini Pro आणि Gemini Ultra बाबत घोषणा करण्याची देखील शक्यता आहे.
Google I/O 2025 दरम्यान Project Astra सादर केला जाण्याची शक्यता आहे. हा एक स्मार्ट वॉयस आणि विजुअल असिस्टेंस आहे. याशिवाय Project Mariner सारखे AI एजेंट्स देखील ईव्हेंटमध्ये सादर केले जाण्याची शक्यता आहे, ज्यांना कंज्यूमर्स आणि एंटरप्राइज यूजर्ससाठी तयार करण्यात आलं आहे.
Android 16 मध्ये नवीन फीचर्स आणि नवीन यूजर एक्सपीरियंस मिळण्याची शक्यता आहे. Android 16 च्या अनेक फीचर्सचा खुलासा आधीच झाला आहे. यामध्ये युजर्सना नवीन डिझाईन पाहायला मिळू शकते.
Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
Google च्या या अपकमिंग इवेंट्सदरम्याान Android XR बाबत नवीन अपडेट्स मिळणार आहेत. Android XR, एक Mixed Reality प्लॅटफॉर्म है. ज्याला Samsung आणि Qualcomm साठी तयार करण्यात आलं आहे.