ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य
सोशल मीडियावरील ट्रॅवल व्लॉगर्सचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा यामध्ये ज्योती मल्होत्राचं नाव देखील घेतलं जातं. हरियाणामधील ज्योती मल्होत्रा गेल्या 3 वर्षांपांसून ट्रॅव्हल व्लॉगिंग करत आहे. तिच्या ट्रॅव्ल व्लॉगमुळेच ती सोशल मीडियावर चर्चेत असते. ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती शेअर करते. तिच्या व्लॉगना लोकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत होता. त्यामुळे ज्योती मल्होत्रा नेहमीच चर्चेचा विषय ठरत होती. ज्योती मल्होत्रा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिच्या चर्चेच कारण कोणताही व्लॉग नाही तर तिच्यावरील गंभीर आरोप आहेत.
Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
ज्योतीला पोलिंसानी अटक केली आहे. तिच्यावर देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला दिल्याचा आरोप आहे. पोलीस ज्योतीची चौकशी करत आहेत. आतापर्यंत झालेल्या चौकशीत ज्योती कोणत्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करत होती, याबद्दल माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य – instagram)
ज्योती ‘ट्रॅवल विद जो’ नावाच्या युट्यूब चॅनेलमुळे प्रचंड फेमस होती. या चॅनेलवर तिचे लाखो सबस्क्राबर्स देखील होते. शिवाय तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील लाखो फॉलोवर्स होते. मात्र आता तिचे हे दोन्ही अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. तिच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्योती एक ट्रॅवल व्लॉगर म्हणून ओळखली जात होती. मात्र ती तिच्या याच ओळखीचा वापर करून भारतातील महत्त्वाची माहिती गोळा करत होती. सोशल मीडियाद्वारे ती केवळ कमाई करत नव्हती तर हेरगिरी देखील करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि टेलीग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत होती. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ज्योती काही खास लोकांसोबत जोडली जात होती आणि भारताबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानात पोहोचवत होती. विशेषत: टेलीग्राम सारख्या अॅप्स जो एन्क्रिप्टेड मॅसेजिंगसाठी ओळखला जातो, याचा वापर गुप्तपणे माहिती पाठवण्यासाठी करण्यात आला होता. ज्योतीने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योती एकटी काम करत होती की या नेटवर्कमध्ये इतर लोक सहभागी होते याचाही तपास एजन्सी करत आहेत.
ज्योतीने अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली होती आणि या संपूर्ण प्रवासाचा व्हिडीओ तिने 6 मार्च रोजी यूट्यूबवर अपलोड केला होता. या व्हिडीओला 32 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले होते. या व्हिडीओवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील नागरिकांनी प्रतिक्रिया दिली होती.