Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ची मोठी घोषणा! Gemini AI अ‍ॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

गूगलने macOS साठी जेमिनी एआयचे नेटिव अ‍ॅप लाँच करून मॅक यूजर्ससाठी मोठी सुविधा आणली आहे. या अ‍ॅपमुळे यूजर्सना डेस्कटॉपवरच जलद आणि स्मार्ट एआय अनुभव मिळणार असून स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2026 | 09:45 AM
Google ची मोठी घोषणा! Gemini AI अ‍ॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

Google ची मोठी घोषणा! Gemini AI अ‍ॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • जेमिनी अ‍ॅप macOS साठी नेटिव स्वरूपात लाँच झाले असून फ्री टियरसह सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
  • “ऑप्शन+ स्पेस” शॉर्टकट, विंडो शेअरिंग आणि फाइल सपोर्टसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत.
  • Apple सोबतच्या पार्टनरशिपनंतर हे अ‍ॅप लाँच झाले असून, यामुळे AI स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
टेक कंपनी गुगलने अलीकडेच त्यांच्या मालकीचे जेमिनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) प्लॅटफॉर्म macOS साठी एक डेडिकेटेड अ‍ॅप स्वरुपात लाँच केले आहे. पहिल्यांदाच माउंटेन व्यूच्या या टेक दिग्गज कंपनीने त्यांचे चॅटबॉट डेस्कटॉपवर एका नेटिव अ‍ॅप स्वरुपात लाँच केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेमिनी सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे, यामध्ये अ‍ॅपच्या फ्री टियरवाल्या यूजर्सचा देखील समावेश आहे. मात्र यूजर्सकडे ऑपरेटिंग सिस्टमचे सपोर्टेड वर्जन असणं गरजेचं आहे. या मोठ्या निर्णयानंतर आता गूगलचे चॅटबोट Apple च्या यूजर बेससाठी चॅटजीपीटी, क्लॉड आणि परप्लेक्सिटी सारख्या चॅटबोट्सना थेट टक्कर देणार आहे.

आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

जेमिनी आता मॅकवर देखील उपलब्ध

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, गुगलचे सिईओ सुंदर पिचाई यांनी मॅक डिव्हाईससाठी गुगलचे एआय चॅटबोट जेमिनी सादर करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, याचे सुरुवातीचे वर्जन कंपनीचे एजेंटिक प्लॅटफॉर्म अँटीग्रॅव्हिटीचा वापर करून तयार करण्यात आले होते आणि याचा प्रोटोटाइप काहीच दिवसांत तयार करण्यात आला होता. हे चॅटबॉट ॲप सर्व समर्थित भाषा आणि देशांमध्ये उपलब्ध आहे. हा अ‍ॅप वापरण्यासाठी यूजर्सच्या डिव्हाईसमध्ये macOS Sequoia (15.0) किंवा त्याहून नवीन वर्जन अपडेटेड असणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

जेमिनीचा macOS साठीचा नेटिव्ह डेस्कटॉप अनुभव अनेक फीचर्ससह येतो. यूजर्सना कोणत्याही स्क्रीनवर अ‍ॅप पटकन उघडता यावे यासाठी, एआय चॅटबॉट ‘ऑप्शन + स्पेस’ शॉर्टकटला सपोर्ट करणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये, कंपनीने स्पष्ट केले आहे की, या शॉर्टकटमुळे यूजर्सना प्रत्येक वेळी एआय चॅटबॉटची मदत घेण्यासाठी वेगळी विंडो उघडण्याची गरज भासणार नाही.

विंडो शेयरिंगची सुविधा उपलब्ध

जेमिनी अ‍ॅपमध्ये विंडो शेयरिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. यूजर्स ब्राउझरमधील किंवा दुसऱ्या ॲपमधील कोणतीही उघडलेली विंडो गूगलच्या चॅटबॉटसोबत शेअर करू शकतात आणि चॅटबॉट त्या विंडोमधील मजकूर त्वरित समजून त्यानुसार प्रतिसाद देतो. हे फीचर लोकल फाइल्सना देखील सपोर्ट करते. त्यामुळे, यूजर्स फाइल स्वतः अपलोड न करता कामाच्या अहवालाबद्दल किंवा एखाद्या गुंतागुंतीच्या डॉक्यूमेंटबद्दल प्रश्न विचारू शकतात. याव्यतिरिक्त, सबस्क्रिप्शन असलेले यूजर्स नॅनो बनाना प्रो (Nano Banana Pro) वापरून प्रतिमा शेअर करू शकतात आणि वेओ 3.1 (Veo 3.1) वापरून व्हिडिओ तयार करू शकतात.

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

पार्टनरशिपच्या 3 महिन्यानंतर अ‍ॅप लाँच

अ‍ॅपल आणि गुगल यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वीच पार्टनरशिपची घोषणा करण्यात आली होती. या पार्टनरशिपच्या 3 महिन्यानंतर हे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहेत. या पार्टनरशिपअंतर्गत, आयफोन निर्माता कंपनीला गूगलचे एक विशेष जेमिनी मॉडेल वापरून ॲपल फाउंडेशन मॉडेल्सच्या (AFM) पुढील पिढीला शक्ती देता येईल. हे मॉडेल सिरीच्या अधिक सक्षम आणि पर्सनलाइज्ड वर्जनलाही शक्ती देईल, जी या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Google launches gemini ai app for macos brings powerful desktop experience to mac users tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • apple
  • Gemini AI
  • google

संबंधित बातम्या

दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल
1

दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या
2

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या

Krishna Janmashtami 2026: सजायला वेळ नाही? नो टेंशन, Gemini AI च्या मदतीने घरबसल्या तयार करा राधाराणीसारखा फोटो
3

Krishna Janmashtami 2026: सजायला वेळ नाही? नो टेंशन, Gemini AI च्या मदतीने घरबसल्या तयार करा राधाराणीसारखा फोटो

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
4

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.