Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Mumbai News: काश्मीरचे बागायतदार मोहम्मद अली शेख यांच्या मते, वेळेत आणि सुरक्षित वाहतुकीमुळे आता बागायतदारांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे.यंदा ३ जूनला कटरा येथून चेरीची पहिली २४ टनाची पार्सल व्हॅन निघाली आणि अवघ्या ३० तासांत वांद्रे टर्मिनसला पोहोचली.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 12, 2026 | 12:00 PM
काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

काश्मिरी सफरचंद आता अवघ्या ३० तासांत मुंबईत! वाहतूक खर्चात ६०% कपात, रस्ते मार्गाऐवजी रेल्वे स्वस्त

Follow Us
Follow Us:

Mumbai News: रस्त्यावरील अडथळे आणि हवामानाचा लहरीपणा यामुळे काश्मीरच्या फळबागा कायम अडचणीत यायच्या. मात्र आता जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाने काश्मीरला देशाच्या बाजारपेठेशी थेट जोडले आहे. त्यामुळे सफरचंद, चेरीसारखा नाशवंत माल जलद आणि कमी खर्चात मुंबईपर्यंत पोहोचू लागला असून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होत आहे.(फोटो सौजन्य – istock)

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

पूर्वी श्रीनगरहून मुंबईपर्यंत ट्रकने माल आणायचा म्हटला की ४५ तासांहून अधिक कालावधी लागत असे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील भूस्खलन, पावसामुळे रस्ता बंद होणे आणि वाहतूक कोंडी यामुळे माल सडण्याचे प्रमाण मोठे होते व्यापारी याच कारणामुळे शेतकऱ्यांकडून कमी दरात उचलत होते. चिनाब आणि अंजी केबल पूल कार्यान्वित झाल्यानंतर ही परिस्थिती बदलली आहे. आता बडगाम-कटरा-दिल्ली-मुंबई हा संपूर्ण रेल्वे कॉरिडॉर सुरू झाला असून मालगाड्या ताशी १०० किमी वेगाने धावत आहेत. त्यामुळे कश्मीरची प्रसिद्ध अशी अक्रोड, केशर, गालिचे आणि शाली उत्पादने थेट महाराष्ट्राच्या बाजारात उपलब्ध होत आहेत.

वेळेत आणि सुरक्षित वाहतुकीमुळे फायदा

या नव्या मार्गामुळे दोन मोठे फायदे झाले आहेत. एक म्हणजे रस्ते मार्गे वाहतूक खर्च प्रति गोणी ८०-९० रुपयांवरून थेट रेल्वे मार्गे १०-१५ रुपये प्रति गोणी पर्यंत खाली आला आहे, म्हणजेच सुमारे ६० टक्के बचत. दुसरे म्हणजे माल खराब होण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. काश्मीरचे बागायतदार मोहम्मद अली शेख यांच्या मते, वेळेत आणि सुरक्षित वाहतुकीमुळे आता बागायतदारांना बाजारात चांगला दर मिळू लागला आहे.

सफरचंदाचा मोठा हिस्सा मुंबईत

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा ३ जूनला कटरा येथून चेरीची पहिली २४ टनाची पार्सल व्हॅन निघाली आणि अवघ्या ३० तासांत वांद्रे टर्मिनसला पोहोचली. त्यापाठोपाठ १३ सप्टेंब २०२५ रपासून बडगाम ते दिल्लीच्या आदर्शनगरपर्यंत विशेष पार्सल सेवा सुरू करण्यात आली. १५ सप्टेंबर २०२५ नंतर आतापर्यंत २० हजार टनांपेक्षा जास्त सफरचंद रेल्वेने देशभरात पाठवण्यात आले आहे, ज्यातील मोठा हिस्सा मुंबई बाजारात आला आहे.

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

काश्मीरी फळांना महाराष्ट्रातील बाजारपेठ मिळवून देण्याची संधी चिनाब रेल्वे पूलामुळे निर्माण झाली. नियमित मालगाड्या, पार्सल क्षमतेची उपलब्धता आणि स्थानकांपासून घाऊक बाजारांपर्यंतची वाहतूक व्यवस्था यामुळे व्यापाराचा विस्तार वाढल्याने शेतकरी आणि व्यापारी समाधानी आहे, अशी माहिती – विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news kashmiri apples to reach mumbai in just 30 hours transport costs slashed by 60 percent sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • apple
  • Indian Railway
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
1

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण
2

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप
3

CJP Mumbai Protest : आंदोलकांची धरपकड सुरूच! शिवाजी पार्क परिसरात पोलिसांची फिल्डिंग, दंगली भडकवण्याचा पोलिसांचा डाव? मनसेचा आरोप

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार
4

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.