
Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज... जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
भारतात ॲपल होमव्ह्यूची किंमत 39,900 रुपये ठेवण्यात आली आहे, तर अमेरिकेत या डिव्हाईसची किंमत $299 म्हणजेच सुमारे 28,000 रुपये आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूजीलँड, यूके आणि अमेरिकेतील ग्राहक ॲपल ऑनलाईन स्टोअर आणि ॲपल स्टोअर ॲपद्वारे आजच ॲपल होमव्ह्यू प्री-ऑर्डर करू शकतात. याची विक्री 13 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ॲपल होमव्ह्यू सिल्वर, स्टारलाइट, रोज पिंक आणि स्पेस ग्रे या चार कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे. हे डिव्हाईस वॉल-माउंटेड वर्जनमध्ये देखील सादर करण्यात आले आहे, ज्याला ॲपल होमव्ह्यू (वॉल-माउंटेड) असं म्हटलं जात आहे.
ॲपल होमव्ह्यूमध्ये ट्रू टोन आणि 500 निट्सपर्यंत ब्राइटनेस वाला 7-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, जो एक एल्युमिनियम डिझाईनमध्ये फिट करण्यात आला आहे. यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या हिंजला जोडलेला एक डोम-शेप स्पीकर बेस दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, या बिजागरीमुळे यूजर्सना टेबलटॉपवर अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी डिस्प्लेचा कोन समायोजित करता येतो.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यूजर डिव्हाईसपासून किती अंतरावर आहे, या माहितीच्या आधारे ॲपल होमव्ह्यूचे इंटरफेस स्क्रीनवर दिसणारी माहिती बदलू शकते. जर एखादी व्यक्ती खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात आहे तर हे डिव्हाईस सोपे आणि बेसिक माहिती दाखवणार आहे. तुम्ही डिव्हाईसच्या जवळ जाताच माहिती खोलवर दाखवली जाईल. ॲपल यामध्ये कस्टमाइजेबल फेसेसचे कलेक्शन देखील देणार आहे, ज्यामध्ये फोटोज, फ्लो आणि स्नूपी समाविष्ट आहे. यासोबतच विजेट्स आणि शेयर्ड फोटो एल्बम्स पाहण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.
सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
ॲपल होमव्ह्यू एकाच वेळी 6 लोकांच्या फेशियल रिकग्निशनला सपोर्ट करतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यामुळे घरातील प्रत्येक सदस्याला स्वतःचे ॲप्स आणि विजेट्स असलेली पर्सनलाइज्ड होम स्क्रीन पाहता येते. मेसेजेस आणि कॅलेंडर सारख्या ॲप्समधील वैयक्तिक माहिती केवळ ओळख पटलेल्या यूजर्सपर्यंत मर्यादित राहणार आहे. तर दुसरीकडे शेयर्ड एल्बम्स आणि म्यूजिक घरातील कोणताही सदस्य ॲक्सेस करू शकतो. ॲपल होमव्ह्यूच्या डिस्प्लेमध्ये दोन कस्टम फुल-रेंज ड्राइवर्स, एक डाउन-फायरिंग वूफर आणि बेसमध्ये दोन फोर्स-कँसलिंग पॅसिव रेडिएटर्स देण्यात आले आहेत.