Smartphone Leaks: Google च्या अपकमिंग स्मार्टफोनचे फिचर्स लीक, अशी असणार डिझाईन... लाँच डेट जाणून घ्या
स्मार्टफोन कंपनी Google ची आगामी स्मार्टफोन सिरीज लवकरच लाँच केली जाणार आहे. याबाबत कंपनीने गेल्या महिन्यात अधिकृतपणे माहिती दिली होती. Google ची ही आगामी स्मार्टफोन सिरीज Google Pixel 10 या नावाने लाँच केली जाणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे टीझर शेअर करण्यास देखील सुरुवात केली आहे.
कंपनीने एक्स प्लॅटफॉर्मवरील Google अकाऊंटवर एक 30 सेकंदांची क्लिप शेअर केली आहे. या टीझर व्हिडिओमध्ये आगामी स्मार्टफोन सिरीजमधील डिव्हाईस Pixel 10 Pro चे डिझाईन पाहायला मिळत आहे. कंपनीने शेअर केलेल्या या टिझरमुळे युजर्स आगामी पिक्सेल स्मार्टफोनच्या लॉचिंगबाबत प्रचंड उत्सुक आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, Google चे हे मॉडेल मूनस्टोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाऊ शकते. कंपनीने शेअर केलेल्या या टीझरमध्ये अपकमिंग फोनच्या कॅमेरा सेन्सरबद्दल देखील माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – X)
21.8.25
Ask more of your phone.Sign up and subscribe on the Google Store for an exclusive offer: https://t.co/5Hwz8QgNX6 pic.twitter.com/1AQrzKqZoB
— Google India (@GoogleIndia) July 22, 2025
Google is officially showing the Pixel 10 already. Assuming this isn’t a 10 Pro, looks like 3 cameras on the base phone is the main thing that’s new. Otherwise… same design 🤓 pic.twitter.com/i3gF7Mshts
— Marques Brownlee (@MKBHD) July 22, 2025
अपकमिंग Pixel 10 Pro च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं, तर या स्मार्टफोनचे डिझाईन काही प्रमाणात Pixel 9 Pro सारखेच असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये देखील हॉरिजॉन्टल कॅमेरा बार मिळणार आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरे सेंसर, LED फ्लॅश आणि टेंप्रेचर सेंसर मिळणार आहे. हे सर्व पिल शेप कॅमेरा आइलँड मॉड्यूलमध्ये दिसत आहेत. आगामी स्मार्टफोनमध्ये कंपनीने फ्लॅट एज डिजाइन आणि ग्लॉसी साइड तशीच ठेवली आहे, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट देखील शेअर केली आहे. असं सांगितलं जात आहे की, Pixel 10 सीरीज 20 ऑगस्ट रोजी रात्री भारतात लाँच केली जाणार असून, 21 ऑगस्टपासून भारतात उपलब्ध होणार आहे. गूगलची लेटेस्ट पिक्सेल सीरीज भारतात Samsung Galaxy S25 सीरीज आणि अपकमिंग iPhone 17 लाइनअपला टक्कर देणार आहे. गुगलची अपकमिंग स्मार्टफोन सिरीज ऑगस्टमध्ये लाँच होणार आहे आणि Apple ची iphone 17 लाइनअप सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता लवकरच भारतात स्मार्टफोनच्या दुनियेत नवी स्पर्धा सुरू होणार आहे. भारतातील स्मार्टफोन युजर्स कोणत्या कंपनीच्या डिव्हाईसला उत्तम प्रतिसाद देतात आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Pixel 10 सीरीजमधील तिन्ही स्मार्टफोन लेटेस्ट Tensor G5 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Pixel 10 मध्ये 6.3-इंच Full HD+ 120Hz OLED डिस्प्ले दिला जाणार आहे, जो Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शनने सुसज्ज असणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोटोग्राफिसाठी पिक्सेल 10 सीरीजमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे.