Elon Musk पुन्हा करणार मोठा धमाका! लहान मुलांसाठी घेऊन येणार AI मित्र 'Baby Grok', सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
गेल्या काही काळापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक असलेला आणि सोशल मीडिया एक्सचा मालक एलन मस्क चर्चेत आहे. या चर्चेचं कारण आहे AI चॅटबॉट Grok. मस्क AI चॅटबॉट Grok मध्ये वारंवार नवीन फीचर घेऊन येत आहे. युजर्स अनुभव अधिक चांगला व्हावा, या उद्देशाने सतत नवीन फीचर रोलाआऊट केले जात आहेत. लोक X वर ट्विट करत आहेत आणि त्याला निर्भयपणे प्रश्न विचारत आहेत आणि तो त्वरित उत्तर देखील देत आहे. त्यामुळे AI चॅटबॉट Grok च्या युजर्स संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हीच प्रगती सुरु असताना आता एलन मस्कने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट करत एक घोषणा केली आहे.
खरं तर, मस्कने 20 जुलै रोजी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक घोषणा केली आहे. मस्कने म्हटलं आहे की, आता त्यांची कंपनी xAI एक डेडिकेटेड किड्स फ्रेंडली बेबी ग्रोक अॅप लाँच करण्याची तयारी करत आहे. हे अॅप खास लहान मुलांसाठी लाँच केलं जाणार आहे. त्यामुळे AI चॅटबोट Grok पेक्षा हे नवीन बेबी ग्रोक वेगळं असणार आहे. यामध्ये फीचर्स देखील बदलले जाऊ शकतात, ज्यामुळे ते युजर्सना वापरण्यात सोपं होईल. असं सांगितलं जात आहे की लहान मुलांना बेबी ग्रोकचा फायदा होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
We’re going to make Baby Grok @xAI, an app dedicated to kid-friendly content — Elon Musk (@elonmusk) July 20, 2025
‘Baby Grok’ हे सध्या उपलब्ध असणाऱ्या AI चॅटबॉट Grok चे एक किड-फ्रेंडली वर्जन असणार आहे. हे अॅप मुलांना सुरक्षित, शैक्षणिक आणि मनोरंजक AI अनुभव देऊ शकते. इतकेच नाही तर हे अॅप मुलांच्या भाषा, समज आणि आवडीनुसार कंटेट देखील सादर करू शकते. ज्यामुळे लहान मुलं सुरक्षितपणे AI चा वापर करू शकतात.
Baby Grok लहान मुलांसाठी एक सुरक्षित आणि मजेदार असं AI चॅटबॉट बनू शकतं, जे कोणत्याही चुकीच्या कंटेंटशिवाय मुलांसाठी फक्त सर्वोत्तम माहिती प्रदान करेल. यासोबतच, मुलांना खेळताना या अॅपद्वारे खूप काही शिकता येईल. त्यामुळे खेळासोबतच अभ्यास देखील होणार आहे. शैक्षणिक खेळ, क्विझ आणि कथा सांगणे यासारख्या फीचर्सचाही यात समावेश आहे, ज्यामुळे मुलांची शिकण्याची क्षमता वाढेल. याशिवाय खेळ आणि विविध अॅक्टिव्हिटीमुळे मुलांना शिकण्यात आवड निर्माण होते.
याशिवाय, AI सोबत बोलल्याने मुलांची भाषा, तर्क आणि प्रश्न विचारण्याची सवय विकसित होईल जी त्यांच्या सर्जनशील विचारसरणीसाठी फायदेशीर आहे. त्याच वेळी, अॅपमध्ये काही पालक नियंत्रण वैशिष्ट्ये देखील पाहिली जाऊ शकतात, ज्यामुळे पालक अॅपचे निरीक्षण करू शकतात आणि कंटेंट कस्टमाइझ करू शकतात. यामुळे मुलांपर्यंत कोणतीही चुकीची माहिती जाणार आहे.