'हा' आहे iPhone खरेदी करण्याचा बेस्ट टाईम, 90 टक्के लोकं करतात ही चूक! स्वस्तात खरेदी करता येणार महागडा फोन
तुम्ही देखील नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करताय का? तर थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक लोकं नवीन iPhone लाँच होताच, तोच खरेदी करण्याचा विचार करतात. पण ज्यांना जुने मॉडेल खरेदी करायचं आहे, त्याचं काय? खरं तर, बरेच लोक योग्य वेळेची वाट न पाहता iPhone खरेदी करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह iPhone खरेदी करण्याच्या अनेक संधी तुमच्याकडे उपलब्ध असतात. याशिवाय नवीन iPhone लाँच झाल्यास जुन्या मॉडेलची किंमत कमी होते. त्यामुळे iPhone खरेदी करण्याची ही देखील एक सुवर्णसंधी असते.
Apple दरवर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची नवीन iPhone सिरीज लाँच करत असते. अशावेळी जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण सप्टेंबरमध्ये नवीन iPhone सिरीज लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेलची किंमत कमी होते आणि iPhone खरेदी करण्याची आणि पैसे वाचवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण होते. आता प्रश्न असा आहे की नवीन आयफोन मॉडेल खरेदी करण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता? (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक टेक इन्फ्लुएंसर्सचं असं मत आहे की, iPhone खरेदी करण्याची सर्वात चांगली संधी म्हणजे जेव्हा नवीन iPhone लाँच होतो तो काळ. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात जर तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार केला तर तुमच्याकडे जास्त चांगले ऑप्शन्स उपलब्ध असणार आहेत. याशिवाय तुम्हाला या डिव्हाईसच्या खरेदीवर चांगल्या डिल्स देखील मिळणार आहेत. खरं तर, जुने आयफोन मॉडेल्स खरेदी करण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. कारण या काळात किमती सहसा मोठ्या प्रमाणात कमी होतात, विशेषतः दिवाळीच्या आसपासच्या सणासुदीच्या विक्रीदरम्यान, आयफोन सर्वात कमी किमतीत उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला iPhone ची खरेदी करायची असेल तर हा काळ सर्वात बेस्ट आहे.
सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर नवीन मॉडेल लाँच होण्यापूर्वी आयफोनची खरेदी करू नका. जर तुमच्याकडे डिस्काऊंट आणि ऑफर्ससह बेस्ट डिल असेल तर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करू शकता. पण कोणत्याही डिस्काऊंटशिवाय नवीन मॉडेल लाँच होण्यापूर्वी आयफोनची खरेदी करणं एक मोठी चूक ठरू शकते. बरेच लोक नवीन मॉडेल खरेदी करण्यात रस घेत नाहीत, परंतु एक ग्राहक म्हणून तुम्ही आयफोन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.
आयफोन खरेदी करण्यापूर्वी, त्याचे रिव्यू तपासा जसे की डिव्हाइसची बॅटरी लाइफ आणि त्याचा सॉफ्टवेअर सपोर्ट किती काळ उपलब्ध असेल याबाबत जाणून घ्या. चार वर्षे जुना आयफोन डिस्काउंटसह खरेदी करणे हा देखील चुकीचा निर्णय असू शकतो, डील कितीही चांगली असली तरी विचारपूर्व निर्णय घ्या.