Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिवशी सुरु होणार Google Pixel 9a ची पहिली विक्री, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मिळणार खरेदीची संधी! असे आहेत स्मार्टफोनचे फीचर्स

Google Pixel 9a First Sale: नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या गुगलच्या नवीन स्मार्टफोनची विक्री एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 31, 2025 | 12:30 PM
या दिवशी सुरु होणार Google Pixel 9a ची पहिली विक्री, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मिळणार खरेदीची संधी! असे आहेत स्मार्टफोनचे फीचर्स

या दिवशी सुरु होणार Google Pixel 9a ची पहिली विक्री, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मिळणार खरेदीची संधी! असे आहेत स्मार्टफोनचे फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी अ‍ॅपलला टक्कर देण्यासाठी स्मार्टफोन कंपनी गुगलने त्यांचा परवडणारा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. गुगलने या महिन्याच्या सुरुवातीला Pixel 9a स्मार्टफोन लाँच केला होता. स्मार्टफोन लाँचिंगच्या वेळी कंपनीने त्याच्या पहिल्या विक्रीची तारीख जाहीर केली नव्हती. त्यामुळे या स्मार्टफोनची विक्री कधीपासून सुरु होणार, याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता अखेर युजर्सची ही उत्सुकता संपणार आहे, कारण कंपनीने या स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीची तारीख जाहीर केली आहे.

Upcoming Smartphones: Realme आणि Moto चे हे डिव्हाईस लवकरच होणार लाँच, काय असणार किंमत? जाणून घ्या सविस्तर

काय सांगतात अहवाल

स्मार्टफोन कंपनी गुगलने लाँच केलेल्या Google Pixel 9a ची पहिली विक्री एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. या स्मार्टफोनच्या विक्रीवेळी युजर्सना मोठ्या प्रमाणात ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, Pixel 9a युनिट्समधील कंपोनेंट क्वालिटीच्या समस्यांमुळे Pixel 9a च्या विक्रीसाठी विलंब होत आहे. या सगळ्यानंतर, गुगलने अखेर Pixel 9a ची विक्री तारीख जाहीर केली आहे. हा फोन एप्रिल महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्या सेलमध्ये अनेक प्रकारच्या बँक सवलती देखील दिल्या जातील. (फोटो सौजन्य – Google)

या दिवशी सुरु होणार Google Pixel 9a ची विक्री

Google Pixel 9a ची विक्री 10 एप्रिलपासून अमेरिका, कॅनडा आणि यूकेमध्ये सुरू होईल. यानंतर, तो 14 एप्रिलपासून संपूर्ण युरोपमध्ये उपलब्ध होईल. भारत, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, तैवान आणि मलेशियामधील ग्राहक 16 एप्रिलपासून हा फोन खरेदी करू शकतील. तथापि, जपानच्या बाजारपेठेतील विक्रीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. भारतात Pixel 9a ची किंमत 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

हा फोन फ्लिपकार्टवर आयरिस, ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्ह कडून 3,000 रुपयांची मर्यादित काळाची कॅशबॅक ऑफर आणि 24 महिन्यांची नो-कॉस्ट ईएमआय सुविधा देखील दिली जात आहे. जर तुम्ही गुगलचे नवीन डिव्हाइस कमी किमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 16 एप्रिलपर्यंत वाट पाहू शकता. हा गुगलच्या Pixel 9 सिरीजमधील सर्वात परवडणारा फोन आहे. त्यातील स्पेसिफिकेशन देखील दमदार आहेत.

Google Pixel 9a ची वैशिष्ट्ये

डिझाइन आणि डिस्प्ले

Google Pixel 9a ची रचना कॉम्पॅक्ट आहे, त्याची फ्रेम सपाट आहे आणि मागे सिग्नेचर कॅमेरा बार नाही. यात 6.3 -इंचाचा पॉलेड डिस्प्ले आहे, जो FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.

कॅमेरा

फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर (OIS सह) आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्रोसेसर, रॅम, स्टोरेज

हा फोन टेन्सर G4 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो प्रीमियम पिक्सेल 9 मालिकेत देखील आहे. यात 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे.

बॅटरी

Pixel 9a मध्ये 5,100mAh बॅटरी आहे, जी 23W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Youth Digital Wellbeing Initiative: लहान मुलांसाठी आता अधिक सुरक्षित होणार YouTube, क्वालिटी कंटेटवर करणार फोकस

सॉफ्टवेअर

हा फोन अँड्रॉइड 15 वर चालतो. त्याला सात वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. ज्यांना दीर्घकालीन अपडेट्स हवे आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

इतर वैशिष्ट्ये

फोनमध्ये IP68 सर्टिफिकेशन, कार क्रॅश डिटेक्शन, वायफाय-6E, eSIM आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Google pixel 9a first sale will start from april 16 in india offers and discounts will also available tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • google pixel
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.