Upcoming Smartphones: Realme आणि Moto चे हे डिव्हाईस लवकरच होणार लाँच, काय असणार किंमत? जाणून घ्या सविस्तर
स्मार्टफोन कंपनी Realme आणि Moto लवकरच त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. यामध्ये Realme Narzo 80 Pro 5G आणि Motorola Edge 60 Fusion यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करणार आहे. या स्मार्टफोनची डिझाईन अनोखी आहे. लाँचिंगपूर्वी या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चला तर Realme Narzo 80 Pro 5G आणि Motorola Edge 60 Fusion बद्दल जाणून घेऊया.
WhatsApp युजर्सची मज्जाच मजा! लवकरच येणार नवीन फीचर्स, बदलणार अॅप वापरण्याचा अनुभव
Realme ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme Narzo 80 Pro 5G लवकरच भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करणार आहे. यात नवीन मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेट देण्यात येईल. Realme Narzo 80 Pro 5G मध्ये Realme Narzo 70 Pro पेक्षा अनेक अपग्रेड असण्याची अपेक्षा आहे. हा आगामी स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या रेंंजमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. चिनी स्मार्टफोन ब्रँडने त्यांच्या भारतातील वेबसाइटवर ‘कमिंग सून’ टॅगसह Realme Narzo 80 Pro 5G सूचीबद्ध केले आहे. फोनमध्ये नवीन MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर असेल याची पुष्टी झाली आहे. हा आगामी स्मार्टफोन या नवीन मीडियाटेक प्रोसेसरसह येणाऱ्या पहिल्या फोनपैकी एक असू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Realme Narzo 80 Pro 5G ने AnTuTu बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर 7,80,000 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्याची चिप ऑक्टा-कोर आर्किटेक्चरवर आधारित आहे, जी TSMC च्या 4nm प्रोसेस नोडवर तयार केली आहे. Realme Narzo 80 Pro 5G ची भारतातील लाँचची झलक दाखवण्यासाठी Amazon ने त्यांच्या वेबसाइटवर एक समर्पित लँडिंग पेज तयार केले आहे. फोनची लाँचिंग तारीख अद्याप माहित नसली तरी, येत्या काही आठवड्यात तो लाँच होण्याची अपेक्षा आहे. अलिकडच्या लीकनुसार, Realme Narzo 80 Pro 5G स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन नायट्रो ऑरेंज, रेसिंग ग्रीन आणि स्पीड सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
Motorola Edge 60 Fusion ची भारतातील लाँचिंग डेट निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने Motorola Edge 60 Fusion फोनच्या भारतात लाँच तारखेची पुष्टी केली आहे . फ्लिपकार्ट मायक्रोसाईटद्वारे फोनची लाँच तारीख उघड करण्यात आली आहे. हा फोन 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. लाँचिंगपूर्वी स्मार्टफोनचे काही फीचर्स समोर आले आहेत.
Motorola Edge 60 Fusion फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये 1.5K वक्र डिस्प्ले उपलब्ध आहे. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 4500 Nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. याशिवाय, फोनमध्ये Mediatek Dimensity 7400 प्रोसेसर असेल. फोनमध्ये 8GB व 12GB RAM चे पर्याय असतील. त्याच वेळी, फोनची स्टोरेज 256GB असेल. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68 आणि IP69 रेटिंग असेल. फोनमध्ये 5500mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. कंपनी फोनसोबत 3 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 4 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार आहे.