Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

Android 17 Updates: अँड्रॉईड यूजर्सचा अनुभव लवकरच बदलणार आहे. कारण अँड्रॉईड 17 मधील फीचर्स यूजर्ससाठी गेमचेंजर ठरणार आहेत. यामध्ये पॉज पॉईंट, स्क्रीन रिअ‍ॅक्शन इत्यादी फीचर्सचा समावेश असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2026 | 12:18 PM
अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव... धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव... धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

Follow Us
Follow Us:
  • Android 17 मध्ये AI आणि स्मार्ट विजेट्ससारखे नवीन फीचर्स मिळणार आहेत.
  • नवीन सिक्योरिटी अपडेट्समुळे मोबाईल अधिक सुरक्षित होणार आहे.
  • क्विक शेअर फीचरमुळे अँड्रॉईड – आयफोन फाईल शेअरिंग सोपे होणार आहे.
Android 17 Top Features: अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर टेक कंपनी गुगलने अँड्रॉईड 17 बाबत अपडेट्स शेअर केले आहेत. अँड्रॉईड 17 मध्ये कंपनी नवीन फीचर्सचा समावेश करणार आहे, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट होणार आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्सना नवीन एआय पावर्ड टूल्स, सिक्योरिटी अपग्रेड्स, क्रिएटर्ससाठी अपडेट्स आणि प्रोडक्टिविटी फीचर्स मिळणार आहेत. या फीचर्सच्या मदतीने यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, अँड्रॉईड 17 अपडेट्स सर्वात आधी गूगल पिक्सेल आणि सॅमसंग गॅलेक्सी फोनसाठी रोलआऊट केले जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कंपनी याच वर्षी इतर अँड्राईड स्मार्टफोनसाठी देखील नवीन अपडेट रोलआऊट करणार आहे. यूजर्सना अँड्रॉईड 17 मध्ये कोणते नवीन फीचर्स वापरण्याची संधी मिळणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

अँड्रॉईड 17 मध्ये यूजर्सना मिळणार हे फीचर्स

ईमोजीचे नवीन डिझाईन

अँड्रॉईड 17 मध्ये 4 हजारहून अधिक इमोजी रिडिजाइन करण्यात आले आहेत. गूगलने नवीन ईमोजीमध्ये 3D लुक जोडला असून डेप्थ देखील समाविष्ट केली आहे. हे नवीन ईमोजी कंपनी सर्वात आधी पिक्सेल स्मार्टफोन्ससाठी रोलआऊट करणार आहे.  (फोटो सौजन्य – YouTube)

पॉज पॉईंट

डिजिटल वेलबीइंगसाठी कंपनी पॉज पॉईंट नावाचे एक नवीन फीचर घेऊन आली आहे. यामध्ये यूजर्स ॲप्सना विचलित करणारे ॲप्स म्हणून चिन्हांकित करू शकतात. यानंतर संबंधित ॲप्स ओपन करताना यूजर्सना 10 सेकंदाचा पॉज टाइमर दाखवला जाणार आहे. यासोबतच हे फीचर यूजर्सना ब्रीदिंग एक्सरसाइज आणि प्रोडक्टिव ॲप्स वापरण्याचा सल्ला देखील देणार आहे.

स्क्रीन रिअ‍ॅक्शन

अँड्रॉईड 17 मध्ये कंटेट क्रिएटरसाठी खास स्क्रीन रिअ‍ॅक्शन फीचर जोडले जाणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर त्यांचा सेल्फी कॅमेरा आणि स्मार्टफोन स्क्रीन एकाच वेळी रेकॉर्ड करू शकणार आहेत. हे फीचर रिअ‍ॅक्शन व्हिडीओ, ट्यूटोरियल आणि कमेंट्रीवाल्या व्हिडीओसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

एआय जनरेटेड विजेट्स

नवीन अपडेटमध्ये ‘क्रिएट माई विजेट’ चा पर्याय देखील मिळणार आहे. ज्याच्या मदतीने यूजर कस्टम होमस्क्रीन विजेट क्रिएट करू शकणार आहेत. यासोबतच गूगल जेमिनी-पावर्ड ऑटोमेशन फीचर देखील विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर तुम्ही एआयच्या मदतीने सामान ऑर्डर करू शकता आणि तिकीट बुक करण्यासारखी काम करू शकणार आहात.

क्विक शेयर अँड एयरड्रॉप सपोर्ट

नव्या अपडेटसोबतच गूगलने शाओमी, ऑनर, वनप्लस, वीवो आणि ओप्पो इत्यादीसाठी क्विक शेयर सपोर्ट विस्तारित केला आहे. आता अँड्रॉईड यूजर्सना एक क्यूआर कोड जनरेट करण्याचा पर्याय मिळणार आहे, जो स्कॅन करून आयफोन यूजर्स फाईल रिसीव्ह करू शकतात. या फीचरमुळे आयफोनवरून अँड्रॉईडवर शिफ्ट होणं आणखी सोपं होणार आहे.

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

नवीन सिक्योरिटी फीचर्स

अँड्रॉईड 17 मध्ये एआय स्कॅम डिटेक्शन, मालवेयर स्कॅनिंग, रिमोट बायोएमेट्रिक लॉकिंग आणि मजबूत एंटी-थेफ्ट प्रोटेक्शन सारखे फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. या फीचर्समुळे तुमचा मोबाईल अधिक सुरक्षित होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Android 17 सर्वात आधी कोणत्या फोनमध्ये येणार?

    Ans: सर्वात आधी Google Pixel आणि Samsung Galaxy फोनमध्ये अपडेट मिळणार आहे.

  • Que: Android 17 मध्ये AI फीचर्स मिळणार का?

    Ans: होय, Android 17 मध्ये Gemini AI आधारित अनेक स्मार्ट फीचर्स मिळणार आहेत.

  • Que: Android 17 मध्ये नवीन सिक्योरिटी फीचर्स कोणते आहेत?

    Ans: एआय स्कॅम डिटेक्शन, मालवेअर स्कॅनिंग आणि अँटी थेफ्ट प्रोटेक्शन आहे.

Web Title: Google shared android 17 features including new emoji design and many more users experience will change tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Android
  • google
  • tech updates

संबंधित बातम्या

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी
1

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
2

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत
3

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर
4

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.