Father's Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle
फादर्स डे निमित्त गूगलने त्याच्या होमपेजवर एक खास डूडल बनवून शेअर केले आहे. या डूडलच्या माध्यमातून जगभरातील सर्व वडिलांचा सन्मान केला आहे. या डूडलद्वारे गूगलने वडिलांचे प्रेम, काळजी आणि कुटूंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. डूडलमध्ये रंगीत डिझाईनसह वडील आणि मुलांमधील भावनिक नाते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गूगलचे होम पेज ओपन केल्यानंतर या डूडलवर क्लिक केले जाते, एक नवीन टॅब ओपन होतो, जिथे फादर्स डे बाबत सांगण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Google)
फादर्स डे निमित्त शेअर करण्यात आलेल्या डूडलबाबत गूगलने सांगितलं आहे की, हा डूडल फादर्स डे साजरा करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यात कागदापासून बनवलेले कार्ड आणि अक्षरे दाखवली आहेत. तसेच मुळा आणि गाजर यांचा वापर करण्यात आला आहे, जे वडिलांची मजबूत साथ, प्रेम आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले गेले आहे.
गूगल त्यांच्या यूजर्ससाठी जगभरातील विशेष दिन, सण, उत्सव, ऐतिहासिक घटना आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या आठवणीत वेळोवेळी खास डूडल तयार करते. कंपनी त्यांच्या होमपेजवरील डूडलद्वारे खास क्षणांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. फादर्स डे सारख्या प्रसंगी, गूगल दरवर्षी आपापल्या अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करते.
फादर्स डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. यासाठी पहिल्यांदा अधिकृत पुढाकार घेऊन 1909 मध्ये वॉशिंग्टनच्या रहिवासी असलेल्या सोनोरा स्मार्ट डोड यांनी घेतला. ज्याप्रमाणे आईसाठी एक विशेष दिवस साजरा केला जातो, त्याचप्रमाणे वडिलांचा सन्मान करण्यासाठीही एक विशेष दिवस साजरा करण्याची कल्पना त्यांनी मांडली. यानंतर अमेरिकेत पहिला फादर्स जे 19 जून 1910 रोजी वॉशिंगटनमधील स्पोकेन शहरात साजरा करण्यात आला. त्यानंतर ही परंपरा अनेक देशांंमध्ये सुरु झाली. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी फादर्स डे यांनी फादर्स डेला अधिकृत राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता दिली.






