Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
रिलायंस जियोचा हा रिचार्ज प्लॅन 200 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी ॲप्ससह 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. कंपनी यूजर्सना या प्लॅनमध्ये 30GB हाय स्पीड डेटा कोणत्याही डेली लिमिटशिवाय ऑफर करणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंगचा लाभ मिळणार नाही. यूजर्स त्यांच्या कोणत्याही ॲक्टिव प्लॅनसोबत हे ‘ॲड-ऑन पॅक’ म्हणून रिचार्ज करू शकतात.
जिओच्या या प्लॅनची किंमत 550 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी ॲप्स आणि 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण 90GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. यूजर्स त्यांच्या कोणत्याही विद्यमान सक्रिय पॅकसोबतच या योजनेचाही लाभ घेऊ शकतात.
जिओ त्यांच्या या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 2 हजार रुपये आहे. यामध्ये देखील यूजर्सना 15 ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस मिळणार आहे. यामध्ये, 1 हजारहून अधिक टिव्ही चॅनेल्स आणि 365GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळणार आहे. हा प्रीपेड प्लॅन आधीच सक्रिय असलेल्या प्लॅनसोबतही खरेदी केला जाऊ शकतो.
जिओच्या या तीन प्लॅन्समध्ये जिओ टीव्ही, जिओ एआय क्लाउडसह जिओ हॉटस्टार, यूट्यूब प्रीमियम, ॲमेझॉन प्राइम, सोनीलिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, फॅनकोड, होईचोई, चौपाल, प्लॅनेट मराठी, कच्चा लंका, टाइम्सप्ले आणि तरंग प्लस या ओटीटीचा ॲक्सेस मिळणार आहे.






