
Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे की, टेक दिग्गज कंपनीने त्यांच्या ईमेल क्लाइंटसाठी अनेक नवीन AI फीचर्स सादर केले आहे. तथापी, यामधील अनेक फीचर्स केवळ गुगल AI प्रो आणि AI अलट्रा सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध असणार आहेत. हे नवीन फीचर्स सुरुवातीला सर्वात आधी अमेरिकेतील इंग्रजी भाषेत रोल आऊट केले जाणार आहेत. त्यानंतर येत्या काही महिन्यांतच हे फीचर्स अधिक प्रदेशांत आणि भाषांमध्ये एक्सपांड केले जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मुख्य फीचर्सपैकी एक AI ओवरव्यू आहे, जे आता जिमेल अंतर्गत दोन मुख्य फीचर्सना पावर देणार आहे. सर्वात आधी, ते सर्च बारच्या खाली असलेल्या एका लहान बॉक्समध्ये इनबॉक्सबद्दलच्या नैसर्गिक भाषेतील प्रश्नांची उत्तरे देईल, जसे ते गुगल सर्चमध्ये दिसते. यामुळे यूजर्सना आता माहिती शोधण्यासाठी कीवर्ड-बेस्ड सर्च किंवा त्यांचे ईमेल स्क्रोल करण्यावर लक्ष देण्याची गरज नाही. कारण साधा शब्द असलेल्या क्वेरीशी संबंधित ईमेल दिसेल. दुसरे फीचर म्हणजे मोठे ईमेल थ्रेड्समधील मुख्य पॉईंट्स निवडून त्याचा सारांश तयार करणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईमेल समराइज करण्याची कॅपेबिलिटी सर्व यूजर्ससाठी रोल आऊट केली जाणार आहे. मात्र नेचुरल-लँग्वेज सर्च केवळ गुगलच्या AI प्रो आणि AI अल्ट्रा सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध असणार आहे.
याशिवाय, कंपनी ईमेल कंपोज करण्यासाठी आणि रिप्लायवर फोकस करण्यासाठी आणखी नवीन टूल्स देखील जोडत आहे. हेल्प मी राईट एक ड्राफ्टिंग टूल आहे, जे एक सिंपल प्रॉम्प्ट किंवा सुरु असलेल्या संभाषणाच्या आधारावर ईमेल टेक्स्ट जेनरेट किंवा रिफाइन करते. यासोबतच जिमेल सजेस्टेड रिप्लाई देखील देणार आहे, जे क्लासिक स्मार्ट रिप्लाई फंक्शनॅलिटीचे एक एडवांस वर्जन आहे, जो क्विक, कॉन्टेक्स्ट-अवेयर रिस्पॉन्स देतो. हे दोन्ही फीचर्स सर्व यूजर्ससाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर एडवांस ग्रामर आणि टोन सजेशनवाला एक नवीन प्रूफरीड फीचर गुगलच्या पेड AI प्लॅनमध्ये समाविष्ट असणार आहे. गुगल एक नवीन AI इनबॉक्स व्यूचे देखील ट्रायल करत आहे, जे मेसेजच्या ट्रेडिशनल लिस्टऐवजी एक प्रोएक्टिव असिस्टेंटप्रमाणे काम करते.
Ans: Gmail ही Google ची मोफत ईमेल सेवा असून त्याद्वारे ईमेल पाठवणे, मिळवणे आणि व्यवस्थापन करता येते.
Ans: Google Account तयार केल्यानंतर Gmail आपोआप अॅक्टिव्ह होते. मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर gmail.com वर जाऊन साइनअप करता येते.
Ans: नाही. Gmail मोफत आहे. मात्र Google Workspace (Business Gmail) साठी शुल्क आकारले जाते.