गुगलचं हे डिव्हाईस लाँच करण्याचं प्लॅनिंग कॅन्सल; लवकरच लाँच होणार पिक्सेल टॅब्लेट 3
गेल्या अनेक दिवसंपासून चर्चा सुरू आहे की गूगल लवकरच पिक्सेल टॅब्लेट 2 लाँच करणार आहे. मात्र टॅब्लेटची लाँचिंग डेट आणि फिचर्स अद्याप कन्फर्म करण्यात आले नव्हते. आता या टॅब्लेटबाबत कंपनीने अपडेट शेअर केली आहे. गूगल पिक्सेल टॅब्लेट 2 लाँच केला जाणार नाही, असं कंपनीने सांगितलं आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल गेल्या अनेक दिवसापासून पिक्सेल टॅब्लेट 2 लाँच करण्याच्या तयारीत होते. या संबंधित अनेक बातम्या देखील समोर आल्या होत्या. परंतु आता एका अहवालात असे म्हटले आहे की कंपनीने पिक्सेल टॅब्लेट 2 वर काम करणे थांबवले आहे. पिक्सेल टॅब्लेट 2 2023 मध्ये लाँच केलेल्या टॅबलेटचा उत्तराधिकारी म्हणून लाँच केला जाण्याची अपेक्षा होती. मात्र आता हा टॅब्लेट लाँच होणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
काही दिवसांपूर्वी एका अहवालात दावा करण्यात आला होता की कंपनी गूगल पिक्सेल टॅब्लेट 3 वर काम करत आहे. ज्याचे सांकेतिक नाव ‘किओमी’ आहे. अहवालात असे म्हटले आहे की गुगलने पिक्सेल टॅब्लेट 2 लाँच करण्याचा प्लॅन रद्द केला आहे. हा टॅब Tensor G4 चिपद्वारे समर्थित असल्याचे सांगण्यात आले होते. असा अंदाज वर्तवला जात होता की हा एक प्रोटोटाइप आहे आणि तो पुढील वर्षी लाँच केला जाऊ शकतो. मात्र आता या सर्व बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण कंपनीने पिक्सेल टॅब्लेट 2 लाँच करण्याचा निर्णय रद्द केला आहे.
अहवालात असेही सांगण्यात आले आहे की कंपनीने पिक्सेल टॅब्लेट 2 लाँच करण्याची योजना रद्द केली असली तरी याचा अर्थ असा नाही की कंपनी कोणताही टॅबलेट लाँच करणार नाही. लवकरच कंपनीचे नवीन डिव्हाईस गूगल पिक्सेल टॅब्लेट 3 लाँच होण्याची अपेक्षा आहे.
गूगल पिक्सेल टॅब्लेट 3 मॉडेलमध्ये Tensor G6 प्रोसेसर असू शकतो. त्यात AI वैशिष्ट्ये असण्याची शक्यता कमी आहे. गूगल पिक्सेल टॅब्लेट 3 ला USB Type-C कंट्रोलर मिळू शकतो, हा पोर्ट USB 3.2 तसेच डिस्प्ले पोर्ट आउटपुट सपोर्टशी सुसंगत आहे.
गुगलसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Google Tensor G2 चिप गूगल पिक्सेल टॅब्लेटमध्ये उपलब्ध आहे. यात 11-इंचाचा डिस्प्ले आणि चार इंबिल्ड स्पीकर आहेत. हे पोर्सिलेन, हेझेल आणि गुलाब या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. टॅबलेट पॉवर बटणामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिले जाणार आहे. कंपनीचं हे नवीन डिव्हाईस तीन मायक्रोफोनसह क्वाड-स्पीकर सेटअपसह सुसज्ज आहे.
यासोबतच हा टॅब्लेट क्रोमकास्ट बिल्ट-इन आणि गुगल असिस्टंटसह लाँच केला जाणार आहे. टॅब्लेट 8GB RAM आणि 128GB किंवा 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. यामध्ये ब्लूटूथ 5.2, वाय-फाय 5 आणि UWB सपोर्ट समाविष्ट आहे. गुगलने पिक्सेल टॅब्लेटसाठी चार्जिंग डॉक देखील जाहीर केला आहे जो चार्जिंग बेस, स्पीकर आणि स्मार्ट डिस्प्ले म्हणून कार्य करतो.