करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
Apple नेहमीच त्यांच्या डिव्हाईसच्या सुरक्षेबाबत नेहमीच कठोर भुमिका घेत असतो. Apple डिव्हाईसची सुरक्षा मजबूत व्हावी, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते. आता देखील कंपनीने एक नवीन सुरक्षा मंत्र बनवला आहे, हा मंत्र तोडणं अशक्य आहे. हीच सुरक्षा तोडण्यासाठी आता Apple ने संपूर्ण जगाला चॅलेंज दिलं आहे. Apple ने 2022 मध्ये Apple Security Bounty Program सुरु केला आहे.
Apple ने सुरु केलेल्या या प्रोग्राम अंतर्गत जर कोणाला iPhone किंवा Apple च्या कोणत्याही इतर डिव्हाईसमध्ये कोणतीही सुरक्षा त्रुटी आढळली तर त्या व्यक्तिला 5,000 डॉलर म्हणजेच सुमारे 4.38 लाख ते 2 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे17.5 करोड रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. बक्षीसाच्या 5 मुख्य कॅटेगिरी आहेत. अॅपलने या बक्षीस कार्यक्रमाची पाच प्रमुख श्रेणींमध्ये विभागणी केली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या हॅकिंग पद्धतींसाठी वेगवेगळे बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
या कॅटेगिरीमध्ये लॉक स्क्रीन बायपास सारख्या त्रुटी शोधणाऱ्या व्यक्तिला 5,000 डॉलर्स ते 100,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 4.38 लाख रुपये ते 87 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे. जर एखाद्या यूजरला डेटा एक्सट्रॅक्शनमध्ये त्रुटी आढळली तर हे बक्षीस 250,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.19 कोटींपर्यंत पोहोचू शकते.
यामध्ये 5,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 4.38 लाख ते 150,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.31 करोड रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
यामध्ये “वन-क्लिक” द्वारे संवेदनशील डेटापर्यंत अनधिकृत प्रवेशासारख्या त्रुटींवर 250,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.19 करोड रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
यामध्ये झिरो-क्लिक अटॅक सारख्या Kernel PAC बायपास वर 1 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 8.7 करोड रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
इथे प्रिविलेज नेटवर्क पोझिशनपासून रिक्वेस्ट डेटावर अटॅक करण्यापर्यंत 150,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.31 करोड रुपयांचे बक्षीस आहे. तर, लॉकडाउन मोडची विशेष सुरक्षा बायपास केल्यानंतर तुम्हाला 2 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 17.5 करोड रुपयांचे बक्षीस मिळू शकते. हे यामधील सर्वात मोठे बक्षीस आहे.
अॅपलचा हा बक्षीस प्रोग्राम केवळ जगातील सर्वात मोठ्या बक्षिसांपैकी एक नाही तर सायबर सुरक्षा तज्ञांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची ही एक सुवर्णसंधी देखील आहे. तुम्ही देखील सायबर सुरक्षा तज्ञ आहात का, तुम्हाला देखील स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी पाहिजे आहे का, तर ही तुमच्यासाठी एक बेस्ट संधी आहे. अॅपलच्या या प्रोग्रामअंतर्गत तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासोबतच मोठं बक्षीस जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे.