चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या Oppo A6 Pro 5G स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपयांपासून सुरु होते. तर या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 23,999 रुपये आहे. कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील देत आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड 2 हजार रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
#OPPOA6Pro5G is the ultimate package. Comes with features like 80W SUPERVOOC™️ Flash Charge & 7000mAh battery, IP69 rating, SuperCool VC System, Reverse Wired Charging and many more to keep you powered. Buy now – https://t.co/YKoAGOq8hO#BuiltForQuality #DurableAndLongLasting pic.twitter.com/zkeKis18OW — OPPO India (@OPPOIndia) January 6, 2026
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Oppo A6 Pro 5G मध्ये 6.75-इंचाचा HD+ (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz टच सैंपलिंग रेट आणि 1,125 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्याता आली आहे. फोनमध्ये डुअल सिम सपोर्ट आणि Android 15-बेस्ड ColorOS 15 देखील आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट आहे, जो एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 बिल्ट-इन स्टोरेजने सुसज्ज आहे.
CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
फोटोग्राफीसाठी Oppo च्या या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जिथे ऑटोफोकस सपोर्ट आणि 76-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 89-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 7,000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
Ans: OPPO ही चीनची कंपनी आहे.
Ans: OPPO ने भारतात 2014 पासून कामकाज सुरू केलं.
Ans: OPPO फोन Android आधारित ColorOS वर चालतात.






