Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, हे अपडेट जास्तीत जास्त सुधारणांवर लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामध्ये लॉक स्क्रीन क्लॉक ग्लिच, फोन अॅपमधील समस्या आणि काही बग्स फिक्स करण्यात आले आहेत. यासोबतच नवीन बीटा अपडेट लाईव्ह इफेक्ट्सचा वापर करून अधिक चांगला गॅलरी परफॉर्मेंस ऑफर करणार आहे. तसेच काही अॅप्समुळे होणाऱ्या बॅटरी ड्रेनच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे आणि विजेट सिलेक्शन स्क्रीनवर सर्च ऑप्शनची विजिबिलिटी देखील सुधारली जाणार आहे. याशिवाय, नवीन अपडेटमध्ये जानेवारी 2026 चा सिक्योरिटी पॅच देखील जोडण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग त्यांचे स्टेबल One UI 8.5 अपडेट सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरीजसह सादर करू शकते. ही स्मार्टफोन सिरीज 25 फेब्रुवारी रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट गॅलेक्सी S26 सीरीजसह गॅलेक्सी S25, S24, S23, आणि S22 सीरीजला देखील मिळणार आहे. गॅलेक्सी S21 FE देखील सपोर्टेड लिस्टमध्ये समाविष्ट आहे. सॅमसंगच्या काही फोल्डेबल डिव्हाईसला देखील हे नवीन अपडेट मिळणार आहे. ज्यामध्ये लेटेस्ट गॅलेक्सी Z Fold 7 आणि Z Flip 7 पासून मागील जेनरेशन सारखे Z Fold 6 / Flip 6, Z Fold 5 / Flip 5, आणि Z Fold 4 / Flip 4 पर्यंत सर्वांचा समावेश आहे.
कंपनी हे अपडेट केवळ प्रीमियम मॉडेल्ससाठीच नाही तर अनेक मिड-रेंजच्या मॉडेल्ससाठी देखील जारी करेल, ज्यामध्ये गॅलेक्सी A73, A56, A55, A54, A36, A35, A34, A26, A25, A24, सोबतच एंट्री-लेवल ऑप्शन जसे A16, A15, आणि A06 देखील समाविष्ट असणार आहे. यासोबतच या लिस्टमध्ये सॅमसंगचे ऑफलाइन आणि ऑनलाइन-फोकस्ड डिवाइस M56, M55, M54, M36, M35, M34, तसेच गॅलेक्सी F56, F55, F54, F36 आणि F34 मॉडेल समाविष्ट असणार आहे.
Ans: सिक्युरिटी सुधारणा, बग फिक्स, परफॉर्मन्स सुधारणा आणि काही फोनसाठी नवीन फीचर्स मिळतात.
Ans: होय, Samsung चे सर्व सॉफ्टवेअर अपडेट्स पूर्णपणे मोफत असतात.
Ans: होय, Wi-Fi किंवा मोबाइल डेटा आवश्यक असतो. Wi-Fi वापरणं अधिक सुरक्षित असतं.






