समोर आली Hacking Ranking! टॉप 10 देशांमध्ये भारताचा समावेश, हा देश आहे पहिल्या क्रमांकावर
हॅकिंगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अगदी सर्वसामान्य माणसांपासून मोठे कलाकार आणि नेते देखील हॅकिंगसारख्या घटनांना बळी पडत आहे. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात हॅकिंगच्या घटनांचा लोकांना सामना करावा लागत आहे. हॅकर्स केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर हॅकर्स सरकारी चॅनेल्स आणि वेबसाईटला देखील हॅक करण्याचा प्रयत्न करत असतात. या सर्व घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. शिवाय डेटा आणि इतर माहिती देखील लिक होते.
सर्वसामान्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हॅकर्स लोकांचे सोशल मीडिया किंवा बँक अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न करतात. दिवसेंदिवस हॅकिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासंबंधित एक रिपोर्ट आता समोर आला आहे. जगातील 10 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्या 10 देशांमध्ये सर्वाधिक हॅकिंगच्या घटना घडतात. या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता समोर आलेल्या या अहवालानंतर भारतीयांची चिंता वाढली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या या रिपोर्टने भारताची चिंता वाढवली आहे. या अहवालानुसार, हॅकिंगच्या घटनांमध्ये भारताचा समावेश टॉप 10 देशांमध्ये आहे. या यादीमध्ये रशियाने अव्वल स्थान गाठलं आहे, तर भारत 10 व्या स्थानावर आहे. यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक हॅकिंगच्या घटना रशियामध्ये घडत आहेत.
रशिया बऱ्याच काळापासून विविध देशांच्या सरकारी वेबसाइट्स, कंपन्या आणि डिजिटल नेटवर्क्सवर सायबर हल्ले करण्यात सक्रिय आहे. यानंतर, या यादिमध्ये युक्रेन दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सायबर क्रियाकलापांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये देखील हॅकिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर चीन आहे. इतर देशांशी तुलना करता चीन तांत्रिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. हा देश विविध देशांच्या डेटावर नजर ठेवण्याच्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे. यादीमध्ये अमेरिका चौथ्या स्थानावर आहे. यादीमध्ये पाचव्या स्थानावर नायजेरिया आहे, जो सामान्यतः ऑनलाइन फसवणूक आणि ईमेल घोटाळ्यांसाठी ओळखला जातो. सहाव्या स्थानावर रोमानिया आणि सातव्या स्थानावर उत्तर कोरिया आहे. त्यानंतर यादीमध्ये आठव्या स्थानावर यूनाइटेड किंगडम आणि नवव्या स्थानावर ब्राझील आहे. तर या यादीमध्ये 10 स्थानावर भारत आहे.
Realme aston martin यांच्यात भागीदारी; ‘Realme GT 7 Dream Edition’ सह-ब्रँडेड मॉडेल सादर
यादीमध्ये टॉप 10 देशांमध्ये रशिया, युक्रेन, चीन, अमेरिका, नायजेरिया, रोमानिया, उत्तर कोरिया, यूनाइटेड किंगडम, ब्राझील आणि भारत यांचा समावेश आहे. भारत या यादीमध्ये 10 व्या स्थानी असला तरी देखील हा चिंतेचा विषय आहे. कारण भारतात दिवसेंदिवस हॅकिंग आणि सायबर क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत भारतात लोकांची ऑनलाइन उपस्थिती झपाट्याने वाढत आहे. भारताला डिजिटल इंडिया बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र यासोबतच सायबर सुरक्षेशी संबंधित अनेक त्रुटी समोर येत आहेत. त्यामुळे आता भारतीयांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यादीमध्ये पाकिस्तानचं नाव नाही. म्हणजेच सर्वाधिक हॅकिंगच्या घटना घडणाऱ्या टॉप 10 देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानचा समावेश नाही.