Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
जर तुम्हाला वेपन स्किनसोबत केसांचे वेगवेगळे डिझाईन्स मिळवायचे असतील, तर आजचा ईव्हेंट हेअर रॉयल तुमच्यासाठी खास असणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये Hair Royale ईव्हेंट सुरु झाला आहे. या स्पेशल ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रमियम रिवॉर्ड्स म्हणून वेगवेगळ्या स्टाईलचे हेयर हेड (Hair Head) जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये जॅकेट आणि बॉटम सारखे आउटफिट्स देखील मिळणार आहे. याशिवाय प्लेअर्सना लूट क्रेट देखील दिले जाणार आहे. लूट क्रेट अनलॉक करून प्लेअर्सना वेपन स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – youtube)
Free Fire Max चा हेयर रॉयल ईव्हेंट गेममधअये लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 6 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान स्पिन करून प्लेअर्स हेयर पॅक, आउटफिट आणि गन स्किन जिंकू शकणार आहेत.






