MWC 2025: लेटेस्ट स्मार्टफोन आणि ईअरबड्ससह HMD चे गॅझेट्स लाँच, स्पेशल फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2025) आजपासून सुरु होत आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन स्मार्टफोन्स आणि गॅझेट्स लाँच होणार आहेत आणि आता या लाँचिंगची सुरुवात झाली आहे. स्मार्टफोन कंपनी HMD ने या ईव्हेंटमध्ये त्यांचे 4 गॅझेट्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये स्मार्टफोन, फीचर फोन, फ्लिप फोन आणि ईअरबड्स यांचा समावेश आहे. कंपनीने या ईव्हेंटमध्ये HMD Fusion X1, HMD Barca 3210, HMD Amped Buds आणि HMD 2660 Flip फोन लाँच केले आहेत.
MWC 2025: Lenovo ची अनोखी संकल्पना! विजेची कटकट सोडा, आता सूर्यप्रकाशाने चार्ज होणार नवीन लॅपटॉप
खरं तर या स्मार्टफोनच्या जगात आजही फीचर फोनची मागणी टिकून आहे. असे अनेक युजर्स आहेत जे स्मार्टफोनला नाही तर फीचर फोनला प्राधान्य देतात. ग्राहकांची हीच पसंती लक्षात घेऊन आता HMD ने स्मार्टफोन आणि फ्लिप फोनसोबतच फीचर फोन देखील लाँच केला आहे. चला तर कंपनीने लाँच केलेल्या या गॅझेट्सच्या स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – Pinterest)
HMD ने गेल्या वर्षी FC Barcelona सोबत भागीदारी केली होती. आता, कंपनीने FCB-थीम असलेला फ्यूजन स्मार्टफोन आणि HMD Barca 3210 फीचर फोन लाँच केला आहे. कंपनीने Barca Fusion ला एका स्मार्ट आउटफिटसह लाँच केले आहे, ज्यावर गोल्डन FCB लोगो आहे. यासोबतच फोनच्या मागील पॅनलवर खेळाडूंचे ऑटोग्राफ देखील आहेत. या स्मार्टफोनचे मुख्य स्पेसिफिकेशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच झालेल्या HMD Fusion सारखेच आहेत. फीचर फोनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात फक्त क्लबचा लोगो उपलब्ध आहे. यात खेळाडूंकडून संदेश, कस्टम वॉलपेपर आणि आयकॉनिक स्नेक गेमचा समावेश आहे.
यासोबतच, कंपनीने कलेक्टर्ससाठी एक खास Barca Fusion एडिशन सादर केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की यामध्ये यूजर्सना दररोज सकाळी प्लेयर्सचे आवाज ऐकायला मिळतील. HMD Barca 3210 फोन बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या Blau आणि Grana च्या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. HMD म्हणते की त्यांनी विशेषतः किशोरवयीन यूजर्ससाठी X1 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Xplora सोबत भागीदारीत विकसित करण्यात आला आहे, जो पालकांना त्यांच्या मुलांच्या स्मार्टफोनवर पूर्ण नियंत्रण देतो. Xplora च्या सबस्क्रिप्शनची किंमत दरमहा 4.99 युरो आहे. यामध्ये यूजर्सना आपत्कालीन SOS, कमी बॅटरी अलर्ट, रिमोट डिव्हाइस अॅक्सेस आणि इंटरनेट आणि सोशल मीडियावर नियंत्रण मिळते.
HMD Amped Buds मध्ये 1,600mAh बॅटरी आहे, जी 95 तासांचा बॅकअप देते. हे इअरबड्स स्लिम डिझाइनसह येतात. हे इअरबड्स इन-इअर डिझाइन आणि स्टेम आणि सिलिकॉन इअर टिप्ससह येतात. इअरबड्सच्या केसला IPX4 रेटिंग आहे आणि बड्स IP54 प्रमाणित आहेत. चार्जिंगसाठी यात USB-C पोर्ट आहे.
ऑडिओ क्वालिटीबद्दल बोलायचे झाले तर, Amped Buds मध्ये 10mm ड्राइव्ह देण्यात आला आहे. हे बड्स अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात. एचएमडीचे नवीनतम बड्स Google Fast Pair ला सपोर्ट करतात. यासह, ते एकाच वेळी दोन डिवाइसशी जोडले जाते. हे तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येते, ज्यामध्ये काळा, निळसर आणि गुलाबी यांचा समावेश आहे.
MWC 2025 मध्ये, कंपनीने HMD Flip 2660, HMD 130 आणि HMD 150 Music सारखे फीचर फोन देखील लाँच केले आहेत. HMD च्या फ्लिप फोनमध्ये 2.8 इंचाचा QVGA डिस्प्ले आणि 1.77 इंचाचा कव्हर QVCA स्क्रीन, 0.3MP कॅमेरा, IP54 रेटिंग, इमरजेंसी बटन आणि 1,450mAh बॅटरी आहे. हा फोन Cosy Black, Twilight Violet आणि Raspberry Red रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
HMD 130 आणि 150 Music बद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे 2.4-इंचाचा QVGA डिस्प्ले, sdcard सपोर्ट, S30+ OS आणि 2,500mAh रिमूव्हेबल बॅटरी आहे. या फोनमध्ये 2W स्पीकर आणि प्लेबॅक कंट्रोल बटण आहे. HMD 150 Music ची डिजाइन थोडी प्रीमियम आहे, ज्यामध्ये QVGA कॅमेऱ्यासह फ्लॅश देखील उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप या नव्याने लाँच झालेल्या डिव्हाईसची किंमत जाहीर केलेली नाही.