Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
हॉनरने हा सुपर एडिशन स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB+512GB, आणि 16GB+512GB या तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4,499 युआन म्हणजेच सुमारे 54,000 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4,999 युआन म्हणजेच सुमारे 63000 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 5,499 युआन म्हणजेच सुमारे 72000 रुपये आहे. हा स्मार्टफोन पॉपकॉर्न यलो, कर्टन ब्लॅक, ओपनिंग स्टेटमेंट आणि ऑलिव्ह ग्रीन या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: X)
हॉनर मॅजिक 9 सुपर एडिशन स्मार्टफोनमध्ये 6.81-इंच ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2788 x 1280, रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो 1.07 बिलियन कलर्सला सपोर्ट करतो. याच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 10,000 निट्सपर्यंत आहे. फोनचे स्क्रीन टू बॉडी रेशिओ 95.5 टक्के आहे, ज्यामध्ये 1.03mm नॅरो बेजल्स देण्यात आले आहेत.
हॉनरने लाँच केलेल्या या मॅजिक 9 सुपर एडिशन स्मार्टफोनमध्ये 11,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिप आणि एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे.
मॅजिक 9 सुपर एडीशन स्मार्टफोनमध्ये 200-मेगापिक्सेलचा सॅमसंग एस5केएचपी5 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या इमेज सेंसरची साइज 1/1.55-इंच, अपर्चर f/1.9 आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी लायटिया 500 टेलीफोटो कॅमेरा लेंस देण्यात आला आहे, जो 3x ऑप्टिकल झूम आणि ओआयएस सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील दिला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
मॅजिक 9 सुपर एडीशन स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 17 वर आधारित मॅजिकओएस 11 वर चालतो. हा फोन वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, एनएफसी, आईआर ब्लास्टर आणि ड्यूल सिम कनेक्टिविटीसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये कूलिंगसाठी विंड-टनल फॅन दिले आहे. या फोनमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर, स्टीरियो स्पीकर आणि IP68, IP69, IP69K रेटिंग मिळाली आहे.






