प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
ओप्पो रेनो 16 टी चीनमध्ये 12 जीबी रॅम+256जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम+512 जीबी स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 3,699 युआन म्हणजेच सुमारे 52,819 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन हार्टबीट, गॅलेक्सी पर्पल आणि मूनलाइट ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या नव्या ओप्पो रेनो 16 टी स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच फ्लॅक्सीबल अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2640×1216 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz आणि पिक्सेल डेनसिटी 460 पीपीआय आहे, जी 1.07 बिलियन कलर सपोर्टसह येते. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1800 निट्स आहे. याचा टच सँपलिंग रेट 240Hz आहे.
ओप्पोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफनमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 8550 सुपर चिपसेट दिला आहे. हा फोन 12GB चे एलपीडीडीआर5एक्स/एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 80W सुपरवूक आणि 80W यूएफसीएस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6700mAh बॅटरी दिली आहे.
नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ओआईएसला सपोर्ट करतो. यासोबतच हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा टेलफोटो कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. हा कॅमेरा सेटअप 3.5x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. हा फोन डुअल व्यू वीडियो रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
कनेक्टिविटीसाठी नव्या स्मार्टफोनमध्ये वायफाय 6, ब्लूटूथ, एनएफसी दिले आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट, यूएसबी टाइप सी आणि डुअल सिम सपोर्ट देखील मिळणार आहे. या फोनमध्ये एआय फीचर्ससाठी एक वेगळे बटन देखील दिले आहे. ओप्पो स्मार्टफोन फोन IP68 / IP69K रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.






