Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर… नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी

Honor Play 70C Launched: तुम्ही 10 हजारांहून कमी किंमतीत नवा स्मार्टफोन शोधताय का? असाच एक स्मार्टफोन आता टेक कंपनी Honor घेऊन आली आहे. या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत अनेक प्रिमियम फीचर्स मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2026 | 09:46 AM
5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर... नव्या Honor ने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी

5,300mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर... नव्या Honor ने उडवली सर्वांची झोप, किंमत खिशाला परवडणारी

Follow Us
Follow Us:
  • Honor Play 70C हा स्मार्टफोन 9 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Helio G81 Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • 5,300mAh बॅटरीमुळे फोनमध्ये 14 तासांपर्यंत स्क्रोलिंग आणि 10 तासांपर्यंत व्हिडिओ कॉलिंगचा दावा कंपनीने केला आहे.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Honor Play 70C या नावाने सादर केला आहे. हॉनर प्ले सिरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन तीन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन बजेट व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये अनेक कमाल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नव्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Gaming Addiction: गेमिंगचं व्यसन लागलंय? घाबरू नका… या सोप्या सवयींनी करा स्वतःवर कंट्रोल

हॉनर प्ले 70 सी ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने नवीन हॉनर प्ले 70 सी स्मार्टफोन 4GB रॅम+ 64GB स्टोरेज, 4GB रॅम+ 128GB आणि 6GB रॅम+ 128GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या 4GB रॅम+ 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 599 म्हणजेच सुमारे 9,000 रुपये ठेवली आहे. तर 4GB रॅम+ 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 699 म्हणजेच सुमारे 10 हजार रुपये आणि 6GB रॅम+ 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 799 म्हणजेच सुमारे 12 हजार रुपये ठेवली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन लेक ब्लू, मूनलिट सिल्वर आणि इंक रॉक ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – X)

हॉनर प्ले 70 सी चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, हॉनर प्ले 70 सी मध्ये 6.75-इंच एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील दिला आहे. हा डिस्प्ले 16.7 मिलियनपर्यंत कलरला सपोर्ट करतो. फोनमध्ये अँड्रॉईड 15 वर बेस्ड मॅजिकओएस 9.0 दिला आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 81 अल्ट्रा प्रोसेसर दिला आहे. यासोबतच फोनमध्ये एआरएम माली-जी52 एमसी2 जीपीयू, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे.

OnePlus चा भारतात डबल धमाका! 8,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… स्मार्टफोनची किंमत वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा!

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये, f/2.2 अपर्चरवाला 13-मेगापिक्सेचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये, f/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये एक्सेलेरोमीटर, ग्रेविटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर सारखे अनेक सेंसर देखील देण्यात आले आहेत. फोनमध्ये ब्लूटूथ, 3.5mm ऑडियो जॅक, जीपीएस, एजीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि BeiDou सारखे अनेक कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. हॉनर डिव्हाईसमध्ये 5,300mAh बॅटरी दिली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर ती 14 तासांपर्यंत स्क्रोलिंग आणि 10 तासांपर्यंत व्हिडिओ कॉलिंगचा वेळ देते असा दावा केला जातो.

Web Title: Honor play 70c launched with 5300mah battery and powerful processor starting price is less than 10 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.