
iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद... Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी
Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर
Honor ने नवीन Honor Power 2 तीन रंगात लाँच केला आहे. यामध्ये iPhone 17 Pro प्रमाणेच भगवा रंग, ब्लॅक आणि व्हाईट ऑप्शन यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 6.79 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रेजलूशनला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेमध्ये 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR चा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये आई केयर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे, जी 3840Hz PWM डिमिंगने सुसज्ज आहे. या फोनमध्ये हार्डवेयर दिले आहे, जे एल्युमिनोसिलिकेट कवरने सुसज्ज आहेत. (फोटो सौजन्य – X)
This 10080mAh power bank has a built-in smartphone. This is the Honor Power2. – 6.79-inch display
– MediaTek Dimensity 8500 Elite chipset
– Up to 12GB & 512GB storage
– 50MP + 5MP rear camera
– 16MP front camera
– MagicOS 10 based on Android 16
– 10080mAh battery
– 27W… pic.twitter.com/ekppLmC36X — Mukul Sharma (@stufflistings) January 5, 2026
Honor Power 2 मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 8500 एलिट चिपसेट देण्यात आली आहे. ज्यासोबतच 12GB LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट देखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड मॅजिकओएस 10 वर आधारित आहे. कंपनीने लाँच केलेल्या या दमदार स्मार्टफोनमध्ये नवीन डुअल वेपर कूलिंग चेंबरचा वापर करण्यात आला आहे, ज्याचे क्षेत्र 40,000mm2 आहे. फोनच्या मागे डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा मुख्य ओआयएस आणि 16MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
Honor ने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये बॅटरीवर फोकस करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 10,800mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये कंपनीने इन-हाउस लेक बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यासोबतच फोनमध्ये 80W वायर्ड आणि 27W रिवर्स वायर्ड चार्जिंग फीचर दिला आहे. हा फोन IP66, IP68, IP69 आणि IP69K ने सुसज्ज आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वायफाय6, ब्लूटूथ 6, एनएफसी, आयआर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन डुअल फ्रिक्वेंसी GPS आणि NavIC ने सुसज्ज आहे.
नवाा स्मार्टफोन सनराइज ऑरेंज (भगवा), मिडनाइट ब्लॅक आणि स्नोफील्ड व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2699 म्हणजेच सुमारे 34,856 रुपये आहे. 12GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2999 म्हणजेच सुमारे 38,730 रुपये आहे.