Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: भारताच्या स्मार्ट ग्लासने टेक वर्ल्ड थक्क! Sarvam AI ने ईव्हेंटमध्ये केली कमाल, वेधले सर्वांचे लक्ष

AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये Sarvam AI ने त्यांचे पहिले स्मार्ट ग्लास सादर केले आहे आहे. Sarvam Kaze कंपनीचे अपकमिंग स्मार्ट ग्लासेस आहेत. सर्वमचे पहिले एआय वेअरेबल्स मे महिन्यात भारतात लाँच केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 02:35 PM
AI Impact Expo 2026: भारताच्या स्मार्ट ग्लासने टेक वर्ल्ड थक्क! Sarvam AI ने ईव्हेंटमध्ये केली कमाल, वेधले सर्वांचे लक्ष

AI Impact Expo 2026: भारताच्या स्मार्ट ग्लासने टेक वर्ल्ड थक्क! Sarvam AI ने ईव्हेंटमध्ये केली कमाल, वेधले सर्वांचे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • AI वेअरेबल्समध्ये भारताची एंट्री! Sarvam Kaze ने सगळ्यांचे लक्ष वेधले
  • स्मार्ट ग्लास आता भारतात! Sarvam च्या नव्या डिव्हाइसची जोरदार चर्चा
  • भारतातून येतोय पुढचा टेक ट्रेंड? Sarvam AI ने दिली हिंट
Sarvam AI ने नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये एक खास गॅझेट सादर केले आहे. या गॅझेटने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. Sarvam AI ने AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये त्यांचे पहिले स्मार्ट ग्लास सादर केले आहे आहेत. एक्सपो ईव्हेंटच्या पहिल्याच दिवशी भारतीय टेक फर्मने घोषणा केली की, कंपनी हार्डवेयर तयार करण्याऱ्या क्षेत्रात त्यांचे पहिले पाऊल ठेवत आहे. याची सुरुवात Sarvam Kaze पासून करण्यात आली आहे. Sarvam Kaze हे कंपनीचे अपकमिंग स्मार्ट ग्लासेस आहेत. ज्याची झलक AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सादर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी रोजी AI एक्सपो 2026 चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात जगभरातील AI फर्म, इंडस्ट्री लीडर, टेक्नोक्रेट आणि एक्सपर्ट सहभागी झाले आहेत. या ईव्हेंटमध्ये अनेक आकर्षक गॅझेट्स सादर करण्यात आले आहेत. या गॅझेट्सने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.

Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! ‘या’ दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स

Sarvam Kaze AI स्मार्ट ग्लासेस

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये Sarvam AI चे को-फाउंडर प्रत्यूष कुमार यांनी घोषणा केली आहे की, भारतीय एआय फर्म एआय टूल्स पुरवण्यापलीकडे त्यांचे उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत आहे. 16 फेब्रुवारी रोजी भारताच्या AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये कंपनीने त्यांचे पहिले प्रोडक्ट Sarvam Kaze AI स्मार्ट ग्लास सादर केले आहे. कंपनी यासा एआय फर्स्ट डिव्हाईस म्हणत आहे. सर्वमचे पहिले एआय वेअरेबल्स मे महिन्यात भारतात लाँच होण्याची पुष्टी झाली आहे. तथापि, सर्वम एआयने अद्याप अचूक लाँच तारीख जाहीर केलेली नाही. मात्र यूजर्सना या डिव्हाईसबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. (फोटो सौजन्य – X) 

Drop 12/14: Models, products, impact – today something different, very different. Launching Sarvam Kaze, our foray into getting our models into the your hands with our devices – designed and built here in India! pic.twitter.com/8RnqO16Idg — Pratyush Kumar (@pratykumar) February 17, 2026

लाँच होण्यासाठी अद्याप काही महिन्यांचा कालावधी शिल्लक

डिव्हाईस अधिकृतपणे लाँच होण्यासाठी अद्याप काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र भारतीय टेक फर्मने Sarvam Kaze AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये डिव्हाईसचे डिजाईन आणि काही फीचर्स सादर केले आहेत. AI स्मार्ट ग्लास ब्लॅक रंगात सादर केले जाऊ शकते. यामध्ये दोन कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्याचा वापर व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी केला जाऊ शकतो, ईमेज क्लिक केल्या जाऊ शकतात आणि एआय असिस्टेंटला प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. याशिवाय समोरील बाजूला एक कटआउट LED रिकॉर्डिंग इंडिकेटर असू शकतो.

Google I/O 2026: काउंटडाउन झाला सुरु… गुगलच्या बहुप्रतिक्षित ईव्हेंटची तारीख जाहीर, Gemini आणि अँड्रॉईडवर असणार फोकस

Sarvam Kaze AI स्मार्ट ग्लास भारतात तयार केले

अपकमिंग Sarvam Kaze AI ग्लासमध्ये माइक्रोफोन देखील असणार आहेत, ज्याच्या मदतीने यूजर्स प्रश्न विचारू शकतात. याशिवाय यामध्ये एक स्पीकर सेटअप देखील आहे. कुमारने म्हटलं आहे की, सर्वम काझे यूजर जे पाहतो डिव्हाईस ते “ऐकतो, समजून घेतो, प्रतिसाद देतो आणि कॅप्चर करतो”. याव्यतिरिक्त, सर्वमच्या एआय प्लॅटफॉर्मसह येणाऱ्या वेअरेबलसाठी परिधान करणारे “कस्टम अनुभव” तयार करू शकतील. कंपनी के एग्जीक्यूटिवने म्हटलं आहे की, Sarvam Kaze AI स्मार्ट ग्लास भारतात तयार आणि डिझाईन करण्यात आले आहेत. कुमार म्हणाले की, आगामी डिव्हाइस वापरून पाहणारे पहिले व्यक्ती पंतप्रधान मोदी होते, जे एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये एआय एक्स्पोचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित होते.

Web Title: Made in india ai smart glasses revealed at ai impact expo 2026 sarvam ai unveils kaze smart glasses tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • AI technology
  • Narendr Modi
  • tech updates

संबंधित बातम्या

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी
1

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत
2

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत

OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण
3

OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर
4

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.