Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर
डायमंड फ्री फायर मॅक्समध्ये वापरली जाणारी इन गेम करन्सी आहे. याचा वापर करून प्लेअर्स वेगवेगळे गेमिंग आयटम खरेदी करू शकतात. डायमंडच्या मदतीने प्लेयर्स कॅरेक्टर, स्किन, इमोट्स, पेट्स, गन स्किन, बंडल आणि ईलाइट पाससारखे गेमिंग आयटम्स अगदी सहज खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
इन गेम करन्सी डायमंडमुळे तुमचा गेम अधिक पावरफुल आणि आकर्षक बनतो. खास कॅरेक्टर स्किल्समुळे तुम्हाला गेममध्ये फायदा होतो. गन स्किनमुळे तुमच्या हत्यारांची शक्ती आणखी वाढते याशिवाय ईलाइट पास मिळाल्यामुळे तुम्हाला एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स आणि मिशनचा अनुभव घेण्याची संधी मिळते.
फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. सहसा प्लेअर्स इन-गेम टॉप-अपमध्ये डायमंड क्लेम करतात. प्लेअर्स गुगल प्ले स्टोअर किंवा ऑफिशियल टॉप-अप वेबसाइटद्वारे पैसे देऊन डायमंड खरेदी करू शकतात. याशिवाय Garena वेळोवेळी प्लेअर्ससाठी इव्हेंट्स आणि ऑफर्स घेऊन येते, ज्यामध्ये प्लेअर्स कमी खर्चात डायमंड खरेदी करू शकतात. काही प्लेअर्स गिवअवे, लाइव स्ट्रीम रिवॉर्ड्स आणि खास इवेंट्समधून डायमंड्स क्लेम करण्याचा प्रयत्न करतात. डायमंड क्लेम करण्यासाठी नेहमी ऑफिशिअल पद्धतीचा वापर करा. याशिवाय गेमिंग कंपनी रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते, ज्याच्या मदतीने प्लेअर्सना डायमंड आणि इतर रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते.
फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर…. Google Maps चे ‘हे’ सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क






