Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Honor Turbo 5G Launched: हॉनरने एका नव्या स्मार्टफोनसह पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंपनीने पावरफुल बॅटरी बॅकअपसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याची किंमत 40 हजार रुपयांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2026 | 02:05 PM
पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स... Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स... Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Follow Us
Follow Us:
  • 8,560mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगमुळे दमदार बॅटरी बॅकअप मिळतो.
  • 6.79-इंच 120Hz ॲमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • 50MP कॅमेरा, IP69 रेटिंग आणि 8GB+256GB स्टोरेज अशी फीचर्स मिळतात.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफान लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Honor Turbo 5G या नावाने सादर करण्यात आला आहे. तीन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमती 40 हजार रुपयांहून कमी आहे. ज्या यूजर्सना पावरफुल बॅटरी बॅकअप आणि टिकाऊ स्मार्टफोन पाहिजे आहे, अशा यूजर्ससाठी कंपनीने त्यांचा हा नवीन स्मार्टफोन डिझाईन केला आहे. सध्या हा फोन युरेशिया क्षेत्रात लाँच करण्यात आला आहे. कंपनी लवकरच इतर देशांमध्ये देखील हा स्मार्टफोन लाँच करू शकते. हॉनर टर्बो 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आता सविस्तर जाणून घेऊया.

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

हॉनर टर्बो 5G ची किंमत आणि रंग पर्याय

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन एका सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये 8GB + 256GB याचा समावेश आहे. कंपनीच्या या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत 33,990 रूबल म्हणजेच सुमारे 39,300 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

हॉनर टर्बो 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, हॉनर टर्बो 5G मध्ये 6.79 इंच ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो फुल एचडी + रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हाय रिफ्रेश रेटमुळे स्मूथ स्क्रोलिंग आणि ॲनिमेशन्सची खात्री मिळते.

प्रोसेसर

परफॉर्मंससाठी कंपनीच्या या नवीन फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. गीकबेंच 6 वर या फोनने सिंगल-कोर स्कोअर सुमारे 1,070 आणि मल्टी-कोर स्कोअर सुमारे 3,060 मिळवला आहे. हा प्रोसेसर रोजच्या वापरासाठी, सोशल मीडिया, व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि सामान्य गेमिंगसाठी अतिशय चांगला मानला जात आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळणार आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी स्मार्टफोनला IP69 रेटिंग मिळाली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी कंपनीच्या या नवीन फोनमध्ये मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे आणि यासोबतच 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे. या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

बॅटरी

कंपनीने हॉनर टर्बो 5G मध्ये 8,560mAh बॅटरी दिली आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनची वजन केवळ 196 ग्रॅम आहे. त्यामुळे हे डिव्हाईस वापरण्यासाठी अतिशय हलके आहे.

Web Title: Honor turbo 5g launched in mid range price segment read features and specifications of smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव
1

लक्षवेधी फीचर्स अन् प्रीमियम लूक! लाँच होताच सुरु झाली Vivo च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
2

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
3

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.