
पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
नवा ऑनर एक्स5डीएस 4GB+64GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत ZAR 2,499 म्हणजेच सुमारे 150 डॉलर म्हणजेच सुमारे 13 हजार रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन इतर बाजारात कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती शेअर केली नाही. (फोटो सौजन्य: Honor)
ऑनर एक्स5डीएस मध्ये प्रायमरी स्क्रीन 6.78 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 600 निट्सची नॉर्मल ब्राइटनेस देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला 2.01 इंच सेकेंडरी एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे. या स्क्रीनच्या मदतीने तुम्ही रिअर कॅमेऱ्याने वन-टॅप सेल्फी क्लिक करू शकता. तसेच या डिस्प्लेवर तुम्हाला कॉल अलर्टपासून म्युझिकपर्यंत आणि इतर मीडिया कंट्रोल करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. या डिस्प्लेमध्ये टच सपोर्ट देखील मिळणार आहे, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव आणखी खास होणार आहे.
तसेच, या स्मार्टफोनमध्ये युनिसॉक टी 610 चिपसेटसह 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळणार आहे. फोनमध्ये 4GB वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्टोरेज डेडिकेटेड थ्री-कार्ड स्लॉटद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 50MP चा रिअर कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. या फोनमध्ये 4x डिजिटल झूम आणि सिंगल एलईडी फ्लॅश देखील मिळणार आहे. फोनच्या रिअर कॅमेऱ्याने 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. तर सेल्फीसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
नव्या ऑनर एक्स5डीएस स्मार्टफोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी मिळणार आहे. तसेच, या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 4G एलटीई, डुअल सिम, वायफाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळणार आहे.