WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
WABetaInfo ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, कंपनी त्यांच्या जुन्या ॲडव्हांस चॅट प्रायव्हसी फीचरचे नाव बदलण्याची तयारी करत आहे. आता हे फीचर यूजर्ससाठी रिस्ट्रिक्टेड चॅट या नावाने उपलब्ध केले जाऊ शकते. यामध्ये प्रायमरी डिव्हाईसचे लिमिटेशन देखील जोडले जात आहे. यूजर्सच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी कंपनीने फीचरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. हा बदल सध्या काही निवडक बीटा यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
हे फीचर ‘चॅट इन्फो’ स्क्रीनवर पाहायला मिळू शकते आणि एखाद्या व्यक्तीसोबतच्या चॅटवर चार प्रकारचे निर्बंध लागू करेल: चॅट करणारा समोरील व्यक्ती त्याच्या फोनमध्ये चॅट मीडिया ऑटोमॅटिकली सेव्ह करू शकणार नाही. तसेच त्याच्यासाठी चॅट एक्सपोर्ट करण्याच्या पर्यायावर देखील निर्बंध घातले जाऊ शकतात. तसेच, समोरील व्यक्ती चॅट करताना मेटा एआयचा वापर देखील करू शकत नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच, संबंधित यूजरला तुमचे चॅट्स ॲक्सेस करण्यासाठी लिंक्ड डिव्हाईस जसे, व्हॉट्सॲप वेब किंवा टॅब्लेटचा वापर करण्यावर देखील निर्बंध घातले जाणार आहेत. WABetaInfo दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये यूजर्सना संभाषणा ॲक्सेस कण्यासाठी अनधिकृत क्लाइंट्स किंवा एआय एजेंट्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचा पर्याय मिळणार आहे.
असे काही अनधिकृत टूल्स आहेत जे सहसा संभाषण ॲक्सेस करण्यासाठी लिंक्ड डिव्हाईसवर अवलंबून असतात. कंपनीने हे फीचर चालू केल्यानंतर चॅटचे मेसेज दोन्ही यूजर्सच्या प्रायमरी डिव्हाईसपर्यंत मर्यादित राहणार आहेत.
दरम्यान, हे प्लॅटफॉर्म बॉटम नेव्हिगेशन बारसाठी एका नवीन आणि सुटसुटीत लूकवरही काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मजकूर लेबल्स नसतील, ज्यामुळे तो आयफोनसारखाच दिसण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने अलीकडेच प्लॅटफॉर्मवरील किशोरवयीन मुलांच्या अकाऊंटसाठी पॅरेंटल कंट्रोल्स सादर केले आहेत. यामुळे मुलांसाठी सुरक्षिततेची हमी आणि प्रवेशावर मर्यादा येतात, ज्यामुळे ते सुरक्षित वातावरणात प्लॅटफॉर्म वापरू शकतात.






