Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How Nuclear Power Makes Electricity: पाण्याच्या वाफेने कशी तयार होते वीज? जाणून घ्या अणुऊर्जा प्रकल्पाचे कार्यशास्त्र

पाण्याच्या वाफेपासून वीज तयार होते, पण अणुऊर्जा प्रकल्पात ही वाफ नेमकी कुठून येते? अणूंच्या विभाजनातून निर्माण होणारी प्रचंड उष्णता पाणी गरम करते आणि त्यातून उच्चदाबाची वाफ तयार होते. पुढे हीच वाफ टर्बाइन फिरवून वीज निर्माण करते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 05, 2026 | 09:20 AM
How Nuclear Power Makes Electricity: पाण्याच्या वाफेने कशी तयार होते वीज? जाणून घ्या अणुऊर्जा प्रकल्पाचे कार्यशास्त्र
Follow Us
Follow Us:
  • अणुभट्टीतील न्यूक्लियर फिजनमधून निर्माण झालेल्या उष्णतेने पाणी गरम होऊन उच्चदाबाची वाफ तयार होते.
  • उच्चदाबाची वाफ स्टीम टर्बाइन फिरवते आणि टर्बाइन जनरेटरच्या मदतीने विजेची निर्मिती करते.
  • टर्बाइनमधील वाफ पुन्हा पाण्यात बदलून स्टीम जनरेटरकडे पाठवली जाते, त्यामुळे प्रक्रिया सतत चालते.
आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन अणुउर्जेचा वापर करून घेतले जाते. अणुऊर्जेचा वापर करून पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर करणे आणि त्या वाफेच्या साह्याने वीज निर्माण करणे ही एक अतिशय रंजक आणि अत्याधुनिक अशी वैज्ञानिक प्रक्रिया आहे. कोळसा किंवा गॅस वापरून जशी उष्णता निर्माण केली जाते, तशीच उष्णता येथे अणूंच्या विभाजनाने मिळवली जाते. आणि त्याच्याच मदतीने पुढे वीज तयार केली जाते.

वीजनिर्मितीची टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया

१. न्यूक्लियर फिजन द्वारे उष्णता निर्मिती

अणुभट्टीत युरेनियम किंवा प्लुटोनियम सारख्या किरणोत्सर्गी मूलद्रव्याच्या अणूंवर न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो. यामुळे अणूचे विभाजन होऊन प्रचंड प्रमाणात उष्णता ऊर्जा निर्माण होते.

२. पाण्याचे उच्च दाबाखालील वाफेमध्ये रूपांतर

अणुभट्टीत निर्माण झालेली ही प्रचंड उष्णता सोसून घेण्यासाठी कुलंट – सहसा पाणी वापरले जाते. हे अतिउष्ण पाणी ‘स्टीम जनरेटर’मध्ये पाठवले जाते. तेथे पाण्याचे रूपांतर उच्च दाबाच्या गरम हाय प्रेशर वाफेमध्ये होते.

India Electricity Export : भारत बनला ‘पावर हाऊस’! ‘या’ देशांना वीज पुरवून कमावतोय कोट्यवधी रुपये

३. वाफेच्या साहाय्याने टर्बाइन फिरवणे

ही अतिउच्च दाबाची वाफ मोठ्या नळ्यांद्वारे स्टीम टर्बाइन वर वेगाने सोडली जाते. वाफेच्या प्रचंड वेगामुळे टर्बाइनचे पंखे वेगाने फिरू लागतात. अशा प्रकारे उष्मा ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होते.

४. जनरेटरद्वारे वीजनिर्मिती

टर्बाइनचा शाफ्ट थेट इलेक्ट्रिक जनरेटरशी जोडलेला असतो. टर्बाइन फिरताच जनरेटरमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्त्वावर विजेची निर्मिती होते. तयार झालेली वीज ट्रान्सफॉर्मरद्वारे ग्रीडमध्ये पाठवली जाते.

Thane News : ठाण्यात महावितरणाचा अजब कारभार, घरातील लोक झोपले असताना बसला स्मार्ट मीटर

५. वाफेचे पुनर्चक्रीकरण

टर्बाइनमधून बाहेर पडलेली वाफ ‘कंडेन्सर’मध्ये आणली जाते. कूलिंग टॉवरमधून येणाऱ्या थंड पाण्यामुळे या वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि हे पाणी पुन्हा वाफ बनवण्यासाठी स्टीम जनरेटरमध्ये पाठवले जाते. अशा तर्हेने याचे रिसायकलिंग केले जाते.

ऊर्जेचे रूपांतरण टप्पे

ही पूर्ण प्रक्रिया एका लूपमध्ये म्हणजे बंदिस्त चक्रात  चालत असल्याने धूर किंवा कार्बनचे उत्सर्जन होत नाही, ज्यामुळे अणुऊर्जा हा स्वच्छ ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो.

Web Title: How nuclear power plants generate electricity steam auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:20 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.