BSNL युजर्सची समस्या संपली! इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी हि आहे बूस्टर ट्रिक! 100 पैकी 80 लोकांना माहिती नाही....
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन प्लॅन लाँच करत असते. या प्लॅनची खासियत म्हणजे कमी किंमतीत जास्त फायदे. BSNL च्या रिचार्ज प्लॅनची किंमती अत्यंत कमी असते. मात्र त्यांच्या फायद्यांमध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. म्हणजेच BSNL त्यांच्या युजर्सना परवडणाऱ्या किंमतीत उत्तम फायदे देते. त्यामुळे रिचार्ज प्लॅनच्या किंमती आणि फायद्यांच्या बाबतीत BSNL युजर्स सहसा कोणतीही तक्रार करत नाहीत. पण जेव्हा BSNL च्या नेटनर्कबाबत विचारलं जात, युजर्स तक्रारींता पाढा वाचायला सुरुवात करतात.
BSNL सिम वापरणाऱ्या युजर्सची सर्वात मोठी समस्या नेटवर्क. फोनमध्ये नेटवर्क समस्या निर्माण झाल्याने इंटरनेट स्पीड देखील कमी होते आणि यामुळे युजर्स प्रचंड वैतागतात. इंटरनेट स्पीड कमी झाल्याने व्हिडीओ सतत बफर होणं, ब्राऊझरचा वापर करणं कठीण होणं तसेच चॅटिंग आणि कॉलिंगमध्ये देखील काही समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावं हे अनेकांना सूचत नाही. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुमच्या फोनमधील इंटरनेट स्पीड वाढवला जाऊ शकतो. नेटवर्क लॉक करणे असो, APN सेटिंग्ज बदलणे असो किंवा लपलेले कॅशे साफ करणे असो, तुम्ही या ट्रिक्स वापरून तुमचा इंटरनेट स्पीड लक्षणीयरीत्या सुधारू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही देखील इंटरनेटच्या खराब स्पीडने वैतागला असाल तर सर्वात आधी तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्कमध्ये APN सेटिंग रिसेट करा. प्रत्येक नेटवर्कचा एक एक्सेस पॉइंट नेम असतो. म्हणजे त्याची APN सेटिंग, जी इंटरनेट स्पीडवर परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही ही सेटिंग रिसेट केल्यास इंटरनेट स्पीड अधिक चांगली करू शकता. ही सेटिंग तुम्हाला क्षुल्लक वाटू शकते, पण ती खूप उपयुक्त सेटिंग आहे. याच्या मदतीने तुमची समस्या अगदी सहज सोडवली जाऊ शकते.
अनेकदा स्मार्टफोन आपोआप खराब नेटवर्क बँडवर शिफ्ट होतो. ज्यामुळे आपल्याला खराब इंटरनेट स्पीडचा सामना कराला लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही नेटवर्क बँड मॅन्युअली निवडून खराब इंटरनेट स्पीडची समस्या सोडवू शकतात. कोणता बँड वेगवान आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही नेटवर्क सेल इन्फो लाइट किंवा नेटमॉन्स्टर सारख्या अॅप्सचा वापर करू शकता. नंतर तुम्ही फोर्स एलटीई ओन्ली किंवा नेटवर्क सिग्नल गुरु सारख्या अॅप्सच्या मदतीने बँड लॉक करू शकता, जे तुम्हाला चांगला वेग देईल.
अनेकदा हिडन कॅशे आणि बॅकग्राउंड सर्विस ऑन राहिल्यास इंटरनेट लवकर संपते, ज्यामुळे अनेक युजर्सना खराब इंटरनेट स्पीडच्या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा डेटा वापर तपासू शकता, नंतर बॅकग्राउंड डेटावर मर्यादा सेट करू शकता. यामुळे तुमचा वेग सुधारेल.