Nothing Phone 3: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 45000 हजार रुपयांनी घसरली स्मार्टफोनची किंमत, स्पेशल ऑफर मिळवा एका क्लिकवर
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बँग दीवाळी सेल 2025 सुरु झाला आहे. या सेलमध्ये गॅझेट्सवर अनेक धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर सुरु असलेला बिग बँग दीवाळी सेल तुमच्यासाठी एक चांगली संधी असू शकते. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये नथिंग स्मार्टफोनची किंमत तब्बल 45 हजार रुपयांनी कमी झाली आहे.
फ्लिपकार्ट बिग बँग दीवाळी सेल 2025 मध्ये अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Nothing Phone 3 या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. तीन महिन्यांपूर्वी Nothing Phone 3 हा स्मार्टफोन 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनची किंमत तब्बल 45 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता हा प्रिमियम स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Nothing Phone 3 स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिस्काऊंट आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलीकडेच Nothing Phone 3 या स्मार्टफोनचा 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिअंट 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 50,118 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनच्या खरेदीवर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 15,325 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जाणार आहे. या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर Nothing Phone 3 स्मार्टफोनची किंमत 34,793 रुपये झाली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Nothing Phone 3 या स्मार्टफोनचा 12GB+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 45,000 रुपयांनी कमी झाली आहे. याशिवाय, जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास युजर्सना आणखी डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे, त्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे.
डिस्प्ले: Nothing Phone 3 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच AMOLED पॅनल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
प्रोसेसर: नथिंग स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 चिपसेट परफॉर्मेंस देण्यात आला आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: Nothing Phone 3 स्मार्टफोन Android 15 बेस्ड Nothing OS 3.5 वर आधारित आहे. कंपनी या स्मार्टफोनसाठी 5 मोठे Android अपडेट देण्याचा दावा करते.
कॅमेरा : Nothing Phone 3 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप (प्राइमरी + पेरिस्कोप टेलीफोटो + अल्ट्रावाइड) देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये फ्रंटला 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: Nothing Phone 3 स्मार्टफोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये Glyph Matrix लाइटिंग सिस्टमसह ट्रांसपेरेंट बॅक डिझाईन देण्यात आली आहे.