Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने SET भरती २०२६ साठी एक चांगली बातमी दिली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२६ होती, परंतु आता ती वाढवून ३१ मार्च २०२६ करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 08:20 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
  • कोणकोणत्या पदांसाठी भरती?
  • कोण कोण अप्लाय करू शकतं?
BSNL Jobs: भारत संचार निगम लिमिटेड BSNL ने SET भरती २०२६ साठी एक चांगली बातमी दिली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२६ होती, परंतु आता ती वाढवून ३१ मार्च २०२६ करण्यात आली आहे. याचा फायदा त्या सर्व उमेदवारांना होईल ज्यांना आतापर्यंत फॉर्म भरता आला नव्हता किंवा ज्यांना थोडा अधिक वेळ हवा होता. आता BE/B.Tech किंवा CA/CMA धारक तरुणांना अर्ज करण्यासाठी पूर्ण एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

कोणकोणत्या पदांसाठी भरती? 

ही भरती सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी काढण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन क्षेत्रांचा समावेश आहे. पहिले क्षेत्र टेलिकॉमशी संबंधित आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल किंवा याशी संबंधित शाखांची पदे आहेत. दुसरे क्षेत्र वित्ताशी (Finance) संबंधित आहे. निवड प्रक्रिया पूर्णपणे कॉम्प्युटर आधारित परीक्षेच्या (CBT) माध्यमातून होईल. या परीक्षेच्या आधारावरच अंतिम निवड केली जाईल. कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.

कोण कोण अप्लाय करू शकतं?

टेलिकॉम पदांसाठी उमेदवाराकडे BE किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल किंवा याशी संबंधित विषयांत असावी. तसेच उमेदवाराला किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत. Finance पदांसाठी उमेदवाराकडे चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील (SC/ST/OBC/PwBD) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

अर्ज शुल्क वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आहे. सामान्य (OC), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना २,५०० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. तर एससी, एसटी आणि दिव्यांग (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1250 रुपये शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. शुल्काचा भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाईन करावा लागेल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

सर्वात आधी BSNL च्या अधिकृत परीक्षा वेबसाईटवर जा. तिथे ‘Senior Executive Trainee Recruitment 2026’ लिंकवर क्लिक करा. आपल्या वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशननंतर लॉगिन करून फॉर्म भरायला सुरुवात करा. फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी आणि शैक्षणिक तपशील भरा. पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रे जसे की मार्कशीट, कॅटेगरी सर्टिफिकेट इत्यादी अपलोड करा. अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करून घ्या आणि प्रिंट काढून सुरक्षित ठेवा. हे पेज पुढील प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचे असेल.

काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरा, कारण चूक झाल्यास फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. फोटो आणि सिग्नेचरचा साईज आणि फॉरमॅट योग्य असावा. जर तुमची पात्रता पूर्ण असेल तर लवकरात लवकर अप्लाय करा, कारण 31 मार्च 2026 नंतर कोणतीही संधी मिळणार नाही. ही बीएसएनएलची एक चांगली भरती आहे जिथे चांगले पॅकेज आणि सरकारी जॉब मिळवण्याची संधी आहे. परीक्षा CBT बेस्ड असेल, त्यामुळे ऑनलाईन मॉक टेस्टचा सराव करत राहा. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी या संधीचा फायदा नक्कीच घ्यावा. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आम्हाला अपडेट नक्की द्या.

1 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळणार, सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या कुठे आणि कसा कराल अर्ज

Web Title: Jobs bsnl senior executive trainee vacancy 2026 eligibility how to get jobs in bsnl last date extended till 31 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • bsnl
  • job news
  • jobs
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
1

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
2

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

DCC Bank Bharti 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘या’ पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर
3

DCC Bank Bharti 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘या’ पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर

Corporate Dress Code For Freshers: ऑफिसमध्ये जाताना फ्रेशर्सनी पोशाखाबाबत कोणती घ्यावी काळजी? जाणून घ्या
4

Corporate Dress Code For Freshers: ऑफिसमध्ये जाताना फ्रेशर्सनी पोशाखाबाबत कोणती घ्यावी काळजी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.