Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स

Smartphone Tips: तुम्ही देखील स्मार्टफोनच्या ब्लर फोटोंनी हैराण झाला आहात का? नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? थांबा काही सोप्या टिप्स वापरून आणि सेटिंग बदलून देखील तुम्ही घरबसल्या स्मार्टफोनचा कॅमेरा ठिक करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 09, 2026 | 09:06 AM
Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा 'या' टिप्स

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा 'या' टिप्स

Follow Us
Follow Us:
  • महागडा स्मार्टफोन खरेदी करून देखील फोटो ब्लर होत आहेत?
  • स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये बदल करून फोटोग्राफीचा अनुभव दमदार होऊ शकतो
  • चांगले फोटो क्लिक करण्यासाठी कॅमेरा लेंस स्वच्छ करा
Smartphone Camera Tips: आजच्या काळात स्मार्टफोन केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी नाही तर फोटोग्राफीसाठी देखील वापरला जातो. कारण सध्या अनेक कंपन्या तगड्या कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लाँच करतात, ज्यामुळे यूजर्सचा फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार होतो. पण अनेकदा असं घडतं की आपण महागडा स्मार्टफोन खरेदी करतो आणि जेव्हा फोटो क्लिक करतो, तेव्हा फोटो ब्लर येतात, ज्यामुळे आपला अनुभव खराब होतो. अशावेळी आपल्याला वाटते की, आपल्या स्मार्टफोनचा कॅमेारा खराब झाला आहे आणि आपण चुकीचा स्मार्टफोन खरेदी केला आहे.

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

अनेकदा फोटो ब्लर होण्यामागील कारण चुकीचा स्मार्टफोन किंवा हार्डवेअर समस्या नसते. फोनच्या सेटिंगमध्ये काही गडबड असल्यास फोटो ब्लर होऊ शकतात. तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने देखील ब्लर आणि खराब फोटो क्लिक केले जात असतील तर टेंशन घेण्याची गरज नाही. स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये तुम्ही काही बदल करून फोनचा कॅमेरा एकदम उत्तम करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created) 

कॅमेऱ्याची काच स्वच्छ करा

सर्वात आधी फोनमधील कोणतीही सेटिंग न बदलता फोनच्या मागील कॅमेऱ्याची काच स्वच्छ करा. अनेकदा बोटांचे ठसे, तेल किंवा धूळीचे कण कॅमेरा लेंसवर जमा होतात. यामुळे लाईट व्यवस्थित कॅप्चर केली जाऊ शकत नाही आणि फोटो ब्लर होतात.

खराब क्वालिटीचे टेम्पर्ड ग्लास किंवा कॅमेरा प्रोटेक्टर

याव्यतिरिक्त, जर तुमच्या फोनवर खराब क्वालिटीचे टेम्पर्ड ग्लास किंवा कॅमेरा प्रोटेक्टर लावला असेल तर यामुळे देखील फोटो ब्लर होऊ शकतात आणि फोटोग्राफीचा अनुभव खराब होऊ शकतो. खराब क्वालिटीचे टेम्पर्ड ग्लास किंवा कॅमेरा प्रोटेक्टर फोटोग्राफीचा अनुभव खराब करतात.

कॅमेरा लेंस स्वच्छ करा

स्मार्टफोन कॅमेऱ्याचे लेंस मायक्रोफायबर कपड्याने साफ करा. कॅमेरा प्रोटेक्टरवर स्क्रॅच आले असेल तर हा कॅमेरा प्रोटेक्टर त्वरित हटवा. या छोट्या टिप्समुळे फोटो ब्लर होण्याची समस्या अगदी क्षणात सोडवली जाऊ शकते. यामुळे तुम्ही चांगल्या क्वालिटीचे फोटो क्लिक करू शकता.

कॅमेरा अ‍ॅपची सेटिंग तपासा

लेंस स्वच्छ असून देखील फोटो चांगल्या पद्धतीने क्लिक होत नसतील तर फोनच्या कॅमेरा अ‍ॅपची सेटिंग तपासणं गरजेचं आहे. सर्वात आधी कॅमेऱ्याचे रिजॉल्यूशन आणि फ्रेम रेटच्या सेटिंगमध्ये जा. इथे फोटो आणि व्हिडीओ लो-क्वालिटी मोडवर सेट असल्यास त्वरित बदला. लो-क्वालिटी मोडऐवजी एचडीआर मोड नेहमी ऑटो मोडवर सेट करा. यामुळे फोन आपोआप लाईट एडजस्ट करेल, ज्यामुळे फोटो अधिक चांगल्या क्वालिटीने क्लिक केले जाऊ शकतात.

डिफॉल्ट मोड

काहीवेळेस चुकून मॅक्रो मोड किंवा मॅनुअल फोकस ऑन केला जातो, ज्यामुळे फोटो क्लिक करताना कॅमेरा योग्य ठिकाणी फोकस करू शकत नाही. या छोट्या सेटिंग रिसेट करून डिफॉल्ट मोड चालू केल्यास तुमच्या फोनची फोटो क्वालिटी अधिक दमदार होऊ शकते. यामुळे तुम्ही फरक अगदी सहज ओळखू शकता.

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

ग्रिड लाइंस वापरा

अनेकदा फोटो क्लिक करताना फोन स्थिर राहत नाही, ज्यामुळे फोटो ब्लर होऊ शकतात. यामुळे कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये जाऊन ग्रिड लाइंस ऑन करा, ज्यामुळे फोटो क्लिक करताना तुम्हाला योग्य फ्रेम मिळू शकते. त्यामुळे, स्क्रीनवर टॅप करून फोकस लॉक केल्याची खात्री करा.

Web Title: Is your smartphone camera clicking blur photos use this tips before going to service centre hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
1

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
3

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
4

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.