Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

तुमचा स्मार्टफोन देखील सतत गरम होत आहे का? स्मार्टफोन सतत गरम होण्यामागे डिव्हाईसचा अतिवापर हे एकच कारण नसते. विविध सेटिंग्जचा स्मार्टफोनवर परिणाम होतो, त्यामुळे अशा सेटिंग वेळीच बदलणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 09, 2026 | 07:00 AM
Tech Tips: 'या' कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग... ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Tech Tips: 'या' कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग... ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Follow Us
Follow Us:
  • स्क्रीनची ब्राईटनेस सतत फुल ठेवल्याने स्मार्टफोन गरम होऊ शकतो
  • बॅकग्राऊंड ॲप्स सतत डेटा आणि बॅटरी दोन्हीचा वापर करत असतात
  • स्मार्टफोनचे लोकेशन आणि जीपीएस सतत चालू ठेवल्याने देखील डिव्हाईस गरम होऊ शकते
 

Smartphone Tips: स्मार्टफोन आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनमुळे आपली अनेक कामं चुटकीसरशी पूर्ण केली जाऊ शकतात. पण अनेकदा स्मार्टफोन अचानक गरम होऊ लागतो, यामुळे आपल्याला काय करावे सूचत नाही. बराच वेळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे डिव्हाईस गरम झाले असेल असे अनेकांना वाटतं. पण प्रत्येकवेळी स्मार्टफोन गरम झाल्यानंतर हे एकच कारण असेल असे नाही. जर तुमचा स्मार्टफोन वारंवार गरम होत असेल तर त्यामागील कारणं जाणून घेणं, अत्यंत गरजेचं आहे.

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

स्क्रीनची ब्राईटनेस सतत फुल असणं

सर्वात पहिले आणि सामान्य कारण म्हणजेच स्क्रीनची ब्राईटनेस सतत फुल असणं. जेव्हा आपण बराच वेळ ऊन्हात असतो, तेव्हा स्मार्टफोनचा वापर करण्यासाठी ब्राईटनेस फुल करावी लागते. यामुळे डिस्प्ले पॅनल आणि प्रोसेसरवर लोड येतो. ज्यामुळे फोन अधिक वेगाने गरम होऊ लागतो. यामुळे तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात की, स्मार्टफोनची ऑटो-ब्राइटनेस सेटिंग चालू करा. यामुळे डिव्हाईस त्याच्या गरजेनुसार ब्राईटनेस ॲडजस्ट करू शकतो, ज्यामुळे फोन जास्त गरम होत नाही.  (फोटो सौजन्य – AI Created) 

बॅकग्राऊंड ॲप्स

बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणाऱ्या ॲप्समुळे देखील स्मार्टफोन जास्त गरम होऊ शकतो. बॅकग्राऊंड ॲप्स सतत डेटा आणि बॅटरी दोन्हीचा वापर करत असतात. यामुळे प्रोसेसर सतत काम करत राहतो, परिणामी स्मार्टफोन गरम होऊ लागतो. यावरील उपाय म्हणजेच सेटिंगमध्ये जाऊन बॅकग्राऊंड ॲप्स रिफ्रेश करा आणि बॅटरीचा वापर तपासा. ज्या ॲप्सचा सतत वापर केला जात नाही अशा ॲप्ससाठी बॅकग्राऊंड रनिंग त्वरित बंद करा.

लोकेशन आणि जीपीएसचा वापर

स्मार्टफोनचे लोकेशन आणि जीपीएस सतत चालू ठेवल्याने देखील डिव्हाईस गरम होऊ शकते. नकाशा किंवा राईडिंग ॲप्स, विविध गेम्स आणि सोशल मीडिया ॲप्स देखील सतत तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात. यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन केवळ अशाच ॲप्सना लोकशन ॲक्सेस द्या, ज्यांची तुम्हाला खरंच गरज आहे. इतर ॲप्ससाठी लोकेशन ॲक्सेस बंद करा.

ॲप्सचे नोटिफिकेशन

जेव्हा सर्व ॲप्सचे नोटिफिकेशन चालू असते प्रत्येक 5 मिनिटांनी फोनची स्क्रीन चालू होते. यामुळे फोन गरम होऊ लागतो. अशावेळी सेटिंगमध्ये जाऊन अशा ॲप्ससाठी नोटिफिकेशन बंद करा ज्यांचा सतत वापर केला जात नाही. यामुळे फोनचे तापमान कंट्रोल केले जाऊ शकते.

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

ऑटो-अपडेट्स

ऑटो-अपडेट्समुळे देखील फोन अनेकदा गरम होऊ शकतो. कारण फोनला वायफाय कनेक्ट होताच ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये आपोआप अपडेट होऊ लागतात. गूगल किंवा क्लाऊड सिंक देखील चालू होते. एकाच वेळी अनेक कामांचा लोड स्मार्टफोनवर येऊ शकतो. यामुळे सेटिंगमध्ये जाऊन ऑटो-अपडेट मॅन्युअलवर सेट करा आणि डेटा सिंक तुमच्या गरजेनुसार चालू ठेवा.

Web Title: Why your smartphone overheating frequently change these settings to keep it cool hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
1

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
2

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
3

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
4

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.